Kapil Dev emotional message for Anshuman Gaekwad battling cancer : भारताचा माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या माजी सहकाऱ्याबद्दल मन जिंकणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. कपिल देव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.

बीसीसीआयने केली एक कोटीची मदत –

माजी क्रिकेपटू अंशुमन गायकवाड यांना सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन कपिल देव यांनी दिले आहे. कपिल देव यांच्याशिवाय संदीप पाटील यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूही गायकवाड यांना मदत करण्यासाठी कार्यरत आहेत. या कठीण काळात त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मदत करण्यास सांगितले होते. या दोन क्रिकेटपटूंच्या विनंतीनंतर बीसीसीआयने एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
anand ahuja viral video
सोनम कपूरच्या पतीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “पैसा असूनही…”
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

कपिल देव यांनी शेअर केला व्हिडिओ –

कपिल देव यांनी एक व्हिडीओ शेअर करत अंशुमन गायकवाड यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. कपिल देव म्हणाले, “हाय अंशू, मला माहित आहे की तू कठीण काळातून जात आहेस. आपण सर्वजण आयुष्यातील कठीण काळातून गेलो आहोत. मला सर्व चांगले दिवस आठवतात. पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्यासोबत खेळलो, तेव्हा तू माझा कर्णधार होतास.”

हेही वाचा – IND vs SL : ‘मला नाही वाटत ड्रेसिंगरुमध्ये दोघात…’, विराट-गौतमबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

कपिल देव पुढे म्हणाला, “मला आठवते मी कर्णधार असताना तू पाकिस्तानविरुद्ध दोनशे धावा केल्या होत्या. या खूप छान आठवणी आहेत. कठीण प्रसंग येतात आणि जातात पण मला माहीत आहे की तू एक लढवय्या आहेस. आनंदी राहा आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत रहा. देवाने तुला जे काही दिले आहे आणि मी प्रार्थन करतो की तू पहिल्यापेक्षा चांगला व्हावा आणि आनंदी रहावा.”

हेही वाचा – Hardik Pandya : ‘मला हार्दिकबद्दल आश्चर्य वाटते की त्याला…’, बडोद्याच्या माजी प्रशिक्षकाची भारताच्या अष्टपैलू खेळाडूवर टीका

कपिल देव यांनी व्यक्त केली मदतीची अपेक्षा –

माजी विश्वचषक विजेत्या कर्णधाराने पुढे सांगितले की, “आपल्या सर्वांना एक दिवस जायचे आहे, परंतु मानवतेची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की आपण क्रिकेटच्या मैदानावर ज्या प्रकारे लढतो. त्याचप्रमाणे जे व्हायचे ते होईल, पण आपण लढत राहिले पाहिजे. मला आशा आहे की आम्ही लवकरच भेटू.” कपिल देव म्हणाले की, आम्ही आमच्या सहकारी खेळाडूंना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.”