Shubman Gill’s reaction on Team India’s win : टीम इंडियाने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या पहिल्या पराभवाचा बदला घेतला. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून २३४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकांत केवळ १३४ धावाच करू शकला. ज्यामुळे भारतीय संघाने १०० धावांनी सामना जिंकला. या शानदार विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल खूप आनंदी दिसत होता.

कालपर्यंत दबाव सहन करू शकलो नव्हतो –

सामन्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “आज मी खूप आनंदी आहे. टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिकेत केलेले पुनरागमन अप्रतिम आहे. आज पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करणे सोपे नव्हते. पॉवरप्लेमध्ये चेंडू इकडे तिकडे फिरत होता, पण ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. कालपर्यंत आमचा युवा संघ दडपण सहन करू शकला नव्हता. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू नवीन आहेत, पण आज संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती.”

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
IND vs BAN Rohit Sharma Take Bold Decision After Winning Toss to Bowl First in India After 9 Years Kanpur Test
IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना
IND vs BAN Rohit Sharma interacts with R Ashwin Daughters
IND vs BAN : विजयानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, अश्विनच्या मुलींशी बोलतानाचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
IND vs BAN Virat Kohli ask to Shakib Al Hasan funny question capture stump mic
Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी

‘आज काय होणार आहे हे आम्हाला आधीच माहीत होतं’ –

शुबमन गिल पुढे म्हणाला, “माझ्या मते पहिल्या सामन्यात दबाव असणे नक्कीच चांगले होते. आम्हाला माहित होतं की आज काय होणार आहे. मला आशा आहे की आगामी सामन्यांमध्ये फलंदाज अशीच कामगिरी करतील. आम्हाला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.” हरारे येथे भारताचा १०० धावांनी विजय हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाने २२९/२ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा

अभिषेक शर्माने शतक झळकावले –

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली. अभिषेकने ४७ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. भारतासाठी अभिषेकचे हे पहिले शतक आहे. शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शून्यावर बाद झाला होता. यासह अभिषेक झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, तसेच तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी डावात शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.