इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून अहमदाबाद कसोटी सामन्याने प्रारंभ होणार आहे. या पाश्र्वभूमीवर झालेल्या तीन दिवसीय तयारी शिबिरात भारतीय संघाने रविवारी जोमाने सराव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय संघाने पाच तास सराव केला. मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर, गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डावेस आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ट्रेव्हर पेन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारचे सत्र चालले. सोमवारी सकाळी भारतीय संघ अहमदाबादकडे प्रयाण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are also in force