लोढा समितीच्या निर्णयावर रविवारी झालेल्या आयपीएलच्या संचालन समितीच्या बैठकीमध्ये ठोस निर्णयाची अपेक्षा होती, पण बैठकीमध्ये या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी कार्यगट स्थापन करत वेळखाऊपणा केला जात असल्याचा आरोप केला आहे. पण हे आरोप खोडसाळपणाचे असून आम्ही समितीचा निर्णय स्वीकारला आहे, असे मंत संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
‘‘मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही लोढा समितीचा निर्णय पूर्णपणे स्वीकारला आहे. या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कार्यगटाची स्थापनाही केली आहे. त्यामुळे वेळखाऊपणा करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही,’’ असे शुक्ला म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्ही लोढा समितीचा निर्णय स्वीकारला असून त्याची योग्य अमंलबजावणी कशी करता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासाठी आम्हीच कार्यगट स्थापन केला आहे. सहा आठवडय़ांनंतर कार्यगट आपला अहवाल सादर करेल आणि तेव्हाच सारे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
आयपीएलमध्ये आठ संघच खेळणार
सध्याच्या घडीला दोन दोन संघांना लोढा समितीने निलंबन केले असले तरी येत्या आयपीएलमध्ये आठ संघच खेळतील. आयपीएलच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. या साऱ्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतरच आम्ही आयपीएल भरवणार आहोत, असे शुक्ला म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा