केरॉन पोलार्डचे वक्तव्य
वेस्ट इंडिज मध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारताविरुद्धच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाने विजय मिळविल्यानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने सांघिक कामगिरीची स्तुती केली आहे. “सध्याचा वेस्ट इंडिज संघ नाविण्यपुर्ण आणि क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करण्यात आपला वेगळा ठसा उमटवणारा संघ बनला आहे.” असे पोलार्डने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. “अखेरीस संघाला योग्य वळण मिळाले आणि तेच महत्त्वाचे आहे.” असेही पोलार्डने स्पष्ट केले.   
सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर २३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडिजने एक विकेट राखून २३० धावांचे लक्ष्य गाठले व मालिकेतील आपला दुसऱया विजयाची नोंद केली आहे.

Story img Loader