विश्वचषकात भारतीय हॉकी संघाला तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागणार आहे. काल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या हॉकी विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केलं. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या म्हणण्याप्रमाणे भारताला या स्पर्धेत गाफील राहुन चालणार नाही. यंदा हॉकी विश्वचषक भुवनेश्वरमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश क गटात करण्यात आला असून भारताला बेल्जियम, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – २०१८ हॉकी विश्वचषकसाठी भारताचा सोप्या गटात समावेश

“विश्वचषकाची स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळत असलो तरीही आम्हाला गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक सामना जिंकून खेळात सुधारणा करण्याकडे आमचा कल असणार आहे.” सुलतान अझलन शहा स्पर्धेसाठी मलेशियात पोहचलेल्या जोर्द मरीन यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे.

विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. यानंतर भारताला बेल्जियम आणि कॅनडाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. “बेल्जियम हा आमच्यासाठी सर्वात कडवा प्रतिस्पर्धी आहे, मात्र याआधीच्या काही स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना मात देऊ शकतो हे आम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळे विश्वचषकात या इतिहासाची पुनरावृत्ती करायला आम्हाला आवडेलं. मात्र कोणत्याही संघाला कमी लेखून आम्हाला चालणार नाही.” मरीन यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या तयारीबद्दल माहिती दिली.