भारताविरुद्धची कोलकाता कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेच्या संघाला यश आलं. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर खिंड लढवत श्रीलंकेने पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाता कसोटीचे पहिले दोन दिवस हे पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे वाया गेले होते. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहील असा अंदाज सर्वांना वर्तवला होता. मात्र, दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीचं शतक, डाव घोषित करण्यासाठी साधलेली वेळ आणि भुवनेश्वर कुमारने केलेला टिच्चून मारा यामुळे अखेरच्या दिवशी कसोटीत अचानक रंगत आली. सामना जिंकण्यासाठी अवघ्या ३ विकेटची आवश्यकता असताना अंधुक प्रकाशाने खोडा घातला आणि दोन्ही पंचांनी खेळाडूंच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या मते अखेरच्या दिवशी आणखी ५-६ षटकांचा खेळ झाला असता तर भारतीय संघाने सामन्यात नक्कीच बाजी मारली असती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा