ट्वेंन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून एका धावेने स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर संघातील एकही सदस्याने रात्रीचे जेवण केले नाही, असे बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने सांगितले.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता. शेवटच्या तीन चेंडूत बांगलादेशला दोन धावा हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या तीन चेंडूत तीन गडी गमावले. हा पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रात्रीचे जेवणही घेतले नाही, असे मोर्तझा म्हणाला. मुर्तझा हा सध्या काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आला आहे. त्यानिमित्त त्याने स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.
आणखी वाचा