राज्यातील अपुऱया क्रिकेट सुविधांविरोधात आवाज उठवत जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट खेळाला पोषक ठरेल अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत असे अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलने म्हटले आहे.   
परवेझ रसूल म्हणतो की, अपुऱया सुविधा आणि खेळासाठी पोषक प्रोत्साहन मिळत नसल्याने जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंना त्यांच्या शैलीत सुधारणा करता येत नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत कोणताही खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
परवेझ रसूल, उन्मुक्त चंदला सचिनची शिकवणी
जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. तेथे खेळण्यासाठी योग्य अशी जम्मूमध्ये एक आणि दुसरे श्रीनगमध्ये अशी दोनच मैदाने आहेत. त्यात नोव्हेंबर महिन्यात बर्फवृष्टी होत असल्याने सहा महिने क्रिकेटला आराम असतो. त्यामुळे याकाळात सरावही करता येत नाही. असेही परवेझ रसूल म्हणाला.
रसूल पर्यटकच राहिला!

Story img Loader