ICC World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुमारे एक लाख ३२ हजार प्रेक्षकांमध्ये हा सामना खेळला जाऊ शकतो. मात्र, सध्या पाकिस्तानचा संघ सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्व संघांना खुले आव्हान दिले आहे. आपण कोणत्याही संघासोबत कुठेही खेळण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थळ बदलण्याची पीसीबीची मागणी आयसीसीने फेटाळून लावली

वास्तविक, बाबरचे हे वक्तव्य त्या प्रकरणानंतर आले आहे जेव्हा आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वर्ल्ड कपचे स्थळ बदलण्याची मागणी फेटाळून लावली होती. पीसीबीने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. पीसीबी चेन्नईतील चेपॉक येथे अफगाणिस्तान आणि बंगळुरूमधील चिन्नास्वामी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू इच्छित नव्हते. तसेच अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध न खेळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, आयसीसीने या सर्व मागण्या फेटाळून लावल्या.

काय म्हणाला बाबर आझम?

बाबर आझम म्हणाला, “आम्ही कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या मैदानावर खेळतो याकडे मला काही फरक पडत नाही. मला वाटते की आम्ही केवळ भारताविरुद्धच खेळायला जात नाही तर तिथे विश्वचषक खेळायला जात आहोत. आमचे लक्ष केवळ एका संघावर (भारत) नाही, नऊ इतर संघ पण आहेत. आणखी संघ ज्यांना आम्ही पराभूत करून अंतिम फेरी गाठू शकतो.”

हेही वाचा: Jadeja wish Dhoni: “लवकरच भेटू पिवळ्या जर्सीत पण…”, रवींद्र जडेजाने धोनीला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

स्थळ बदलण्याच्या आयसीसीच्या मागणीला नकार देताना बाबर म्हणाला, ” आम्ही कुठेही खेळायला तयार आहोत पण व्यावसायिक खेळाडू म्हणून जिथे जिथे क्रिकेट खेळले जाते, तिथे तिथे सामने होतात. पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते. आम्हाला प्रत्येक देशात प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे.”

पाकिस्तान पाच मैदानांवर विश्वचषक सामने खेळणार आहे

पाकिस्तानला अहमदाबादव्यतिरिक्त हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या पाच मैदानांवर सामने खेळायचे आहेत. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर म्हणाला की, “ब्रेकनंतर पुन्हा खेळण्यासाठी आम्ही उत्साहित असून विश्वचषकापूर्वी चांगली तयारी करण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना १६ जुलैपासून गाले येथे तर दुसरा कसोटी सामना २४ जुलैपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.”

हेही वाचा: PSL: पीएसएल क्रिकेट संघाचे मालक आलमगीर खान यांनी का केली आत्महत्या? डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

विश्वचषकापूर्वी आशिया कप

यानंतर ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये पाकिस्तान, भारत आणि श्रीलंकेसह आशियाई संघही सहभागी होणार आहेत. आशिया चषक ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानात खेळवले जातील आणि सुपर-फोर आणि फायनलसह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. त्याचवेळी ५ ऑक्टोबरला गतविजेता इंग्लंड आणि गतविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. दोन उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत आणि अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We dont have to win the match against india in the world cup but we have to win the world cup babar azam avw
Show comments