केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणि इन्चॉनला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना लवकरच बक्षिसाची रक्कम वितरीत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमओएचे अध्यक्ष अजित पवार, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कार्यकारिणी सदस्य नामदेव शिरगांवकर यांच्या समवेत आम्ही तावडे यांची नुकतीच भेट घेतली व संघटनेच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे रोख बक्षीस दिले जाते. ती रक्कम त्वरित दिली जावी अशी मागणी आम्ही केली. त्याचा गांभीर्याने विचार करीत ही रक्कम वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी ग्वाही तावडे यांनी दिली आहे.