२०१७ साली आयसीसीने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा दिल्यापासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाने केलेली प्रगती वाखणण्याजोगी आहे. झिम्बाब्वेत पार पडलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत अफगाणिस्तानने आयर्लंडवर मात करत २०१९ साली होणाऱ्या मुख्य स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. मात्र अफगाणिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या फिरकीपटू राशिद खानला आपला संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरेल याची अजिबात खात्री नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – आयर्लंडला नमवत अफगाणिस्तान क्रिकेट टीमची वर्ल्डकपमध्ये धडक

विश्वचषक पात्रता फेरीच्या साखळी सामन्यांमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी चांगली झालेली नव्हती. हा संघ सर्वोत्तम सहाच्या गटात प्रवेश करेल याचीही कोणाला खात्री नव्हती. मात्र इतर संघांच्या सामन्यांनंतर बदललेली गणितं आणि नशिबाच्या जोरावर अफगाणिस्तानचा संघ सर्वोत्तम सहाच्या गटात दाखल झाला. “सर्वोत्तम सहाच्या गटात आल्यानंतर आमच्या खेळात कमालीचा बदल झाला. आम्ही वेस्ट इंडिजला पराभवाची चव चाखायला लावली. यानंतर संयुक्त अरब अमिरात विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात लागलेला अनपेक्षित निकाल, या कारणांमुळे मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची आशा आम्ही सोडून दिली नव्हती.” आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हीच सकारात्मक उर्जा घेऊन मैदानात उतरल्याचा आम्हाला फायदा झाल्याचं राशिद खान म्हणाला.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात राशिद खानने ४० धावांच्या मोबदल्यात ३ गड्यांना माघारी धाडलं. झिम्बाब्वे विरुद्ध संयुक्त अरब अमिरात सामन्यात आम्ही पुढच्या सामन्यासाठी रणनिती आखत असताना, आमच्या संघातील एका सदस्याने येऊन झिम्बाब्वे हरल्याची माहिती दिली. यानंतर मुख्य स्पर्धेत दाखल होण्यासाठी आमच्याजवळ केवळ एक टक्का संधी असल्याचं प्रशिक्षकांनी आमच्या मनात ठासून भरवलं. यामुळे आयर्लंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असं राशिद खान म्हणाला.