India vs New Zealand, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा पाचवा सामना न्यूझीलंडसोबत आहे. किवी संघानेही या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि सलग चार सामने जिंकले आहेत. आता हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. यजमान भारत संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, पण न्यूझीलंड संघाला कमी लेखता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत न्यूझीलंड संघाचा उपकर्णधार टॉम लॅथम म्हणाला की, “आमच्या संघात जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे.” मात्र, भारतीय क्रिकेट संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे त्याने मान्य केले. त्याने विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.

हेही वाचा: World Cup 2023: राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेतली एम.एस. धोनीची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पत्रकार परिषदेत लॅथमने सांगितले की, “न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी बरेच सामने खेळले आहेत. यामुळे अनेक खेळाडूंना भारताची खेळपट्टी आणि परिस्थिती चांगलीच माहिती आहे. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी दाखवत आहोत. इंग्लंडमध्येही आम्ही उत्कृष्ट खेळ दाखवला होता. लॅथमने सांगितले की, जेव्हाही आयसीसीच्या स्पर्धेत भारतासोबत सामना होत असे, तेव्हा चुरशीची स्पर्धा होते.

टॉम पुढे म्हणाला की, “भारतात पूर्णपणे भिन्न परिस्थिती आहे. आम्ही पूर्ण क्षमतेने खेळत आहोत. भारताच्या टॉप ऑर्डरने आतापर्यंत खूप अप्रतिम खेळ दाखवला आहे. तसेच, गोलंदाजी आक्रमण देखील उत्कृष्ट आहे. न्यूझीलंडचा संघही पूर्ण लयीत आहे. धरमशालाचे मैदान हे सामान्य आहे. आम्हालाही भारताविरुद्धच्या गोलंदाजांविरुद्ध जपून खेळावे लागेल. ही नवीन खेळपट्टी आहे. हे लक्षात घेऊन आम्ही एक सांघिक योजना देखील बनवत आहोत.” टॉम पुढे म्हणाला, “अफगाणिस्तानविरुद्धचा मोठा विजय भारताविरुद्ध खेळण्यासाठी मोठी मदत करेल. धरमशालाच्या मैदानात दव हा घटक खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि सध्या तिथे बऱ्यापैकी थंडी आहे. न्यूझीलंडचा संघ या सर्व बाबी विचारात घेत आहे.”

हेही वाचा: ENG vs SA, World Cup: गतविजेत्या इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर टेकले गुडघे, विजयासाठी ठेवले ४०० धावांचे डोंगराएवढे आव्हान

दोन्ही संघांची प्लेईंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, इशान किशन, शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, इश सोधी, जेम्स नीशम, टिम साउथी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have the capability to defeat any team in the world kiwi captain said before ind vs nz avw
Show comments