साखळी गटातील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ जागा झाला आहे. जागतिक हॉकी लीगमधील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बचावफळी मजबूत करण्यावर भारताचा भर राहणार आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाकडून सहा गोल स्वीकारले ही गोष्ट निश्चितच संघ व्यवस्थापनास अडचणीत टाकणारी आहे. मलेशियाविरुद्ध त्यांनी अझलान शाह स्पर्धेत मार खाल्ला होता. साहजिकच त्यांच्याविरुद्ध बुधवारी येथे होणाऱ्या लढतीत भारताला सर्वोच्च कामगिरी करावी लागेल.
भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झाला असला तरी येथील पराभव त्यांना परवडणारा नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविणारा हा संघ असल्यामुळे मलेशियाविरुद्ध त्यांना पूर्ण ताकदीनिशी खेळावे लागणार आहे.

सामन्याची वेळ : रात्री ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स  व स्टार स्पोर्ट्स एचडी १

Story img Loader