रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण भारतीय संघातर्फे आदरांजली वाहिली. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी होते आहे. कर्णधार विराटनेही यावेळी भारतीय संघ देशभावनेसोबत असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटसेनेचा नेट्समध्ये कसून सराव

“या हल्ल्यानंतर आम्हा सर्वांना धक्का बसला होता. भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात खेळू नये यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि देशातील जनतेची जी भावना असेल तीच भावना आमच्या सर्वांची असल्याचं विराटने स्पष्ट केलं.” 16 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा सामना होणार आहे. हा सामना खेळायचा की नाही याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चा करुन घेण्यात येईल असं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – ….तर भारतीय संघ विश्वचषकात खेळणार नाही – प्रशिक्षक रवी शास्त्री