न्यझीलंड विरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी किवींनी भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर सलामीवीर शिखर धवनने अजूनही भारताचा विजयी आशा कायम आहेत आम्ही उद्या जिंकण्याच्या इर्शेनेच खेळू असे म्हटले आहे.
शिखर धवन म्हणाला, न्यूझीलंड संघाला सामन्याला कलाटणी देण्यात यश आले असले तरी, भारतीय संघाच्या विजयी आशा अजूनही कायम आहेत. उद्याचा दिवस आमचा असेल आम्ही विजयाच्या दृष्टीनेच खेळू असेही धवन म्हणाला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने नाबाद २८१ धावांची तडफदार खेळी साकारून न्यूझीलंड संघाला ३२५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली आहे. चौथ्या दिवसाअखेर कीवींची धावसंख्या ६ बाद ५७१ अशी झाली आहे. उद्याचा शेवटचा दिवस असल्याने जलद गतीने उर्वरित फलंदाजांना बाद करून तितक्याच जलद गतीने फलंदाजी करण्याची गरज भारतीय संघाकडून अपेक्षित आहे. तरच संघाला विजय प्राप्त करता येईल नाहीतर सामना अनिर्णीत राखण्याची नामुष्की ओढावण्याची चिन्हे बळकट आहेत. त्यामुळे सामन्याचा पाचवा दिवस रोमांचक असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा