वानखेडेवर रणजी क्रिकेट करंडकाचा अंतिम सामना होणार असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना स्थानिक संघातून खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली होती. या विनंतीवर बीसीसीआयने आपला निर्णय देताना ‘एकदिवसीय मालिका सुरू असताना खेळाडूंना स्थानिक सामन्यांसाठी सोडू शकत नाही,’ असे म्हटले आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांनाही सौराष्ट्रकडून अंतिम फेरीत खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
जर अजिंक्य आणि रोहित हे दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळत नसतील तर त्यांना रणजीच्या अंतिम फेरीमध्ये खेळण्याची बीसीसीआयने परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती, असे एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले.