भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील बंदी, ऑलिम्पिक स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याचा चाललेला घाट, राष्ट्रीय अधिकृत महासंघाअभावी जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थता या पाश्र्वभूमीवर बुधवारचा दिवस भारतासाठी अतिशय आशावादी ठरला आहे. आयओएवरील बंदी मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर झालेली बैठक यशस्वी झाली. अमेरिका, रशिया व इराण यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवीत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे स्थान अबाधित राखण्यासाठी चंग बांधला आहे. जिम्नॅस्टिक्समधील मतभेदांमुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणानेच आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धाकरिता संभाव्य संघाची निवड करण्याची आणि या खेळाडूंची तयारी करून घेण्याची जबाबदारी स्वत:कडे स्वीकारली आहे.

Story img Loader