भारताची स्टार टेबल टेनिस महिला खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. वास्तविक, बत्राने आशियाई चषक टेबल टेनिस २०२२ मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. हे पदक जिंकण्यासोबतच तिने इतिहास रचला आहे. आशियाई चषक टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत तिने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू हिना हयातचा ४-२ असा पराभव केला.

कांस्यपदकाच्या सामन्यात इतिहास रचला

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने आशियाई चषक टेबल टेनिस २०२२ मध्ये कांस्यपदक सामन्यामध्ये शानदार खेळ दाखवला. तिने या कांस्यपदकाच्या लढतीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची महिला टेबल टेनिसपटू हिना हयातला कोणतीही संधी दिली नाही आणि सामना ४-२ असा जिंकला. या विजयासह मनिका बत्रा आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ती सुवर्णपदकावर नाव कोरेल अशी सर्व भारतीयांची अपेक्षा असली तरी, उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला जपानच्या चौथ्या मानांकित मीमा इटोने पराभूत केले. या पराभवाने बत्रा यांचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, तिने हिंमत न हारता कांस्यपदकाचा सामना जिंकून इतिहास रचला.

मनिका बत्रा ही उपांत्य फेरी गाठणारी पहिली महिला खेळाडू ठरली

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राही आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चायनीज तैपेईची खेळाडू चेन सू यू हिचा ४-३ असा पराभव केला. मनिकाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या चेन हसू यू हिच्यावर शानदार विजय नोंदवला होता. तिने चेन सू यूचा ६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९ असा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Story img Loader