India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates : मुंबईतल्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या जुगलबंदीत भारतीय संघाने न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट्स पटकावत भारताला विजय मिळवून दिला. रनमशीन विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक, श्रेयस अय्यरचं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दमदार प्रत्युत्तर दिलं पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा प्रतिकार अपुराच ठरला. सेमी फायनलची दुसरी लढत आज कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा रविवारी मुकाबला होणार आहे. दरम्यान, वानखेडेतील सामन्यावरून खुद्द नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शमीचं कौतुक केलं आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

हेही वाचा >> Ind vs New: भारतीय संघ अंतिम फेरीत; धावांच्या मैफलीत ‘सुपर सेव्हन’सह मोहम्मद शमी किमयागार

“अनेकांच्या वैयक्तिक कामगिरीमुळे सेमी फायनल हा आणखी खास ठरला आहे. या खेळातील आणि संपूर्ण वर्ल्ड कपमधील शमीची गोलंदाजी क्रिकेटप्रेमी कायमस्वरुपी स्मरणात ठेवतील . शमी चांगला खेळला!”, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी X वर केली आहे.

शुबनम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीने न्यूझीलंडची अवस्था ३९/२ अशी झाली. न्यूझीलंडचे डेव्हॉन कॉनवे आणि रचीन रवींद्र झटपट माघारी परतले. पण यानंतर केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ चेंडूत १८१ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. मोहम्मद शमीने केनला बाद करत ही जोडी फोडली. केनने ६९ धावांची चांगली खेळी केली. शमीने त्याच षटकात टॉम लॅथमला बाद करत न्यूझीलंडला आणखी धक्का दिला. यानंतर मिचेलला ग्लेन फिलीप्सची साथ लाभली. मिचेलने यादरम्यान शतकही साजरं केलं. शमीने फिलीप्सला बाद करताच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा मावळल्या. मिचेलने ९ चौकार आणि ७ षटकारांसह १३४ धावांची एकाकी झुंज दिली. भारताकडून मोहम्मद शमीने ७ विकेट्स पटकावल्या.

नरेंद्र मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी X वर पोस्ट करून विराट कोहली आणि मोहम्मद शमीचं अभिनंदन केलं आहे. टीम इंडियाचे अभिनंदन. हे यश अपेक्षित होतं. विराट कोहलीचे त्याच्या विक्रमासाठी आणि मोहम्मद शमीचे त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल विशेष अभिनंदन. वर्ल्ड कप फायनलसाठी ऑल द बेस्ट!, असं शरद पवार म्हणाले.