विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर आठवडाभरातच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१० साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या ब्राव्होने आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्याने आजवरच्या कारकिर्दीत ४० कसोटी सामने खेळले आहेत. याबद्दल बोलताना ब्राव्होने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मी माझा निर्णय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवला आहे. मात्र, यापुढे क्रिकेटच्या अन्य प्रकारांमध्ये संघाकडून खेळण्यास मी उत्सुक असल्याचे त्याने यावेळी म्हटले.
ड्वेन ब्राव्होचा कसोटी क्रिकेटला अलविदा!
विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर आठवडाभरातच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
First published on: 31-01-2015 at 12:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies all rounder dwayne bravo quits test cricket