West Indies announced their 13 member squad for the second Test match: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना २० जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजने आपला १३ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यजमान वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४१ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघात बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू रॅमन रेफरच्या जागी फिरकीपटू केविन सिंक्लेअरला संघाचा भाग बनवण्यात आले आहे. रेमन रेफर पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, दोन्ही डावात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
nta decides to postponed ugc net exam date due to festivals
‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

रेफरने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या २ चौकारांच्या मदतीने आणि दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीमध्ये ४ षटके टाकली, ज्यामध्ये त्याने १६ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. आत्तापर्यंत रेफरने आपल्या कारकिर्दीत ८ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा – VIDEO: धोनीच्या गॅरेजमधील कार आणि बाईक्सची संख्या पाहून चकीत झाला व्यंकटेश प्रसाद; म्हणाला, ‘हे तर शोरुम…’

केविन सिंक्लेअरने वेस्ट इंडिजकडून मिळणार कसोटी पदार्पणाची संधी?

केविन सिंक्लेअरने आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने मार्च २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ७ वनडे आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २५.६३ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने ३७.५०च्या सरासरीने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Smriti Mandhana Birthday: टीम इंडियाच्या नॅशनल क्रशचा आज २७वा वाढदिवस, जाणून घ्या तिची आतापर्यंतची कामगिरी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजचा संघ –

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उप-कर्णधार), अलिक अथानेज, टॅगिनेरयन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन.

Story img Loader