ICC World Cup 2023 Qualifier: ७० आणि ८०च्या दशकात वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात मजबूत आणि धोकादायक असा क्रिकेटचा संघ होता. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची फौज असायची. फलंदाजीमध्ये क्लाइव्ह लॉईडपासून विव्ह रिचर्ड्स, डेसमंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिजपर्यंतच्या नावांचा समावेश होता. यामुळे वेस्ट इंडिजने पहिले दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले. तिसर्‍यामध्येही संघ अंतिम फेरीत पोहोचला पण भारताकडून पराभव पत्करावा लागला. याला अजूनही क्रिकेटमधील सर्वात मोठे अपसेट मानले जाते कारण त्या वेस्ट इंडिज संघाशी सामना करणे ही एक मोठी गोष्ट होती. पण कालांतराने वेस्ट इंडिज क्रिकेटची अवस्था बिकट होत गेली. आता परिस्थिती अशी आहे की २०२३च्या विश्वचषकात संघ खेळणार की नाही यबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुबळ्या झिम्बाब्वेकडून हरले

झिम्बाब्वेविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी पराभव झाला. २६८ धावा केल्यानंतर झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला २३३ धावांवर रोखले. ही झिम्बाब्वेची स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या होती. मात्र, या पराभवानंतरही वेस्ट इंडिजने सुपर-६ मध्ये स्थान निश्चित केले आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याबरोबरच सुपर-६ मध्ये टॉप-२ स्थान मिळविणारा संघच वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा: Jos Buttler: मालामाल होणार जोस बटलर! राजस्थान रॉयल्स इंग्लंडच्या कर्णधाराबरोबर कोटींचा करार करण्याच्या तयारीत

नवख्या नेदरलँड्सकडूनही वेस्ट इंडीजचा लाजीरवाणा पराभव

सोमवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव पाहिला. त्यांनी चांगली फलंदाजी करताना ३७४/६ अशी मोठी धावसंख्या उभारली. निकोलस पूरनने अवघ्या ६५ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०४ धावा केल्या होत्या. पण नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरूचे (१११) उत्कृष्ट शतक आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या उत्कृष्ट ६७ धावांमुळे विंडीज संघाला सामना सुपर ओव्हरमध्ये गमवावा लागला.

पात्रता फेरीतील ‘अ’ गटात विंडीजने अमेरिका आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर त्यांना झिम्बाब्वे आणि नंतर नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला. आता त्यांनी जर सुपर सिक्समधील तिन्ही सामने जिंकले तरच तिला २०२३च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. कारण विंडीजचा संघ केवळ ४ गुणांसह सुपर सिक्स फेरीत पोहोचला आहे, दुसरीकडे झिम्बाब्वेचे ८ गुण आहेत आणि नेदरलँडचा संघही ६ गुणांसह येथे पोहोचला आहे.

हेही वाचा: R. Ashwin: कोहलीने अश्विनला दिले ७ शॉट्सचे पर्याय, अ‍ॅश अण्णाला आजही आठवतो पाकिस्तान सामन्यातील ‘तो’ रोमांचक क्षण; पाहा Video

सुपर सिक्सचे उर्वरित तीन संघ ‘ब’ गटातून येतील, जे श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान आहेत. श्रीलंकेचे आतापर्यंत ८ गुण झाले आहेत. सुपर ६ मधील अव्वल दोन संघच २०२३च्या विश्वचषकासाठी पात्र ठरतील. यामध्ये आता झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा वरचष्मा दिसत आहे. उर्वरित सामने जिंकण्याबरोबरच विंडीजलाही काही मोठे अपसेटची वाट पाहावी लागेल. अन्यथा विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून बाहेर पडणे निश्चित दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies are in danger of being out of world cup 2023 defeat against netherlands is difficult avw