West Indies beat England: वेस्ट इंडिजाच्या संघाने उत्कृष्ट पुनरागमन करत इंग्लंडला पराभवाचा मोठा धक्का दिला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले ३ सामने गमावत विडिंज संघाने मालिका गमावली असली तरी चौथ्या सामन्यात अशी काही कामगिरी केली की इंग्लंडचा संघ अवाक् झाला. वेस्ट इंडिजने २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलग ३ चेंडूत ३ मोठे विकेट गमावूनही १९ षटकांत हा धावांचा डोंगर गाठला आणि सामन्यात विजय मिळवला. यासह वेस्ट इंडिजने ७ वर्षे जुना विक्रमही आपल्या नावे केला आहे.

चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट गमावत २१८ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने ३५ चेंडूत ५५ धावांची स्फोटक खेळी खेळली. तर मधल्या फळीत जेकब बेथेने वादळी फलंदाजी करत ३२ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय कर्णधार जोस बटलरने २३ चेंडूत ३८ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर आता २१९ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना एव्हिन लुईस आणि शे होप या दोन्ही सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या ९ षटकांत १३६ धावा केल्या. पण, यानंतर या सामन्यात अचानक इंग्लंडने पुनरागमन केले.

India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
England reach 500000 Test runs first team to achieve landmark
England World Record: ५ लाख धावा! इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO
IND vs AUS Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?
IND vs AUS 2nd Test India Playing XI and Toss Update Rohit Sharma to bat at no 6
IND vs AUS 2nd Test: ठरलं! रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर फलंदाजीला उतरणार, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल

हेही वाचा – IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?

१०व्या षटकाच्या पहिल्या ३ चेंडूत वेस्ट इंडिजने ३ मोठ्या विकेट गमावल्या. सलामीवीर एव्हिन लुईस प्रथम बाद झाला. त्यानंतर शे होप आणि नंतर निकोलस पूरन बाद झाले. वेस्ट इंडिजची धावसंख्या बिनबाद १३६ धावा होती, त्यावरून ३ बाद १३६ धावांवर पोहोचली. तीन विकेट्समुळे सामना अचानक फिरल्याने इंग्लंडच्या आशाही उंचावल्या होत्या. पण, वेस्ट इंडिजने मात्र आपली कामगिरी सुरू ठेवली.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल

सलामीवीरांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कॅरेबियन कर्णधार रोव्हमन पॉवेलने संघाचा डाव पुढे नेला. कर्णधाराला रदरफोर्डनेही चांगली साथ देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एविन लुईसने ३१ चेंडूत सर्वाधिक ६८ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर शे होपने २४ चेंडूत ५४ धावा केल्या. कर्णधाराने २३ चेंडूत ३८ धावा केल्या. तर रदरफोर्ड १७ चेंडूत २९ धावा करून नाबाद परतला.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम

वेस्ट इंडिजने मोडला ७ वर्षे जुना विक्रम

इंग्लंडने दिलेले २१९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने एक षटक आणि ५ गडी गमावून पूर्ण केले. यासह, त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये घरच्या मैदानात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा ७ वर्षांचा जुना विक्रमही मोडला. वेस्ट इंडिजने २०१७ मध्ये मायदेशात भारतासमोर १९४ धावांचे लक्ष्य गाठले होते. पण आता वेस्ट इंडिजने ५ बाद २२१ धावा करत २१९ धावांचे लक्ष्य गाठले.

Story img Loader