Pakistan vs West Indies 2nd Test Highlights in Marathi: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात वेस्ट इंडिजने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात जोमेल वॅरिकन आणि गुडाकेश मोती यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने विजय मिळवला. पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम या सामन्यातही सपशेल अपयशी ठरला.

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला होता आणि आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकेल असे वाटले होते, पण तसं होऊ शकलं नाही आणि वेस्ट इंडिजने विजय मिळवला. या सामन्यातील पाकिस्तानची ही रणनीती त्यांनाच महागात पडली. जोमेल वॅरिकनला दुसऱ्या सामन्यासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही त्यालाच पुरस्कार मिळाला. वेस्ट इंडिज संघाने ३५ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. वेस्ट इंडिजचा पाकिस्तानमध्ये शेवटचा कसोटी विजय १९९० मध्ये होता.

Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
Torres Scam
Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
WTC Points Table Pakistan Finish Last After West Indies Defeat in Multan Test as Spin Plan Backfires
WTC Points Table: पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवानंतर अजून एक धक्का, WTC गुणतालिकेत पहिल्यांदाच…
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मुलतानमध्ये दुसरी कसोटी जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजने पाकिस्तानसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, स्वत:च्या मैदानावरही पाकिस्तानी संघ कॅरेबियन गोलंदाजांसमोर अपयशी ठरला. पाकिस्तान संघाची अवस्था इतकी वाईट होती की लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना २०० धावाही करता आल्या नाहीत. २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ १३३ धावांवर आटोपला.

दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १६३ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डावही स्वस्तात आटोपला. पाकिस्तान केवळ १५४ धावा करू शकला. पहिल्या डावात ९ धावांची आघाडी घेतल्यानंतर विंडीजने दुसऱ्या डावात २४४ धावा केल्या. आणि पाकिस्तानला २५४ धावांचे लक्ष्य देण्यात यशस्वी झाला.

जोमेल वेरिकन ठरला वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो

वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला जोमेल वेरिकन, ज्याने या सामन्यात ९ विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात पाकिस्तानच्या ४ फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतले. याशिवाय खालच्या फळीत फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात खेळलेल्या ३६ धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी केली. वॅरिकनच्या या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

Story img Loader