पाच एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱयावर आलेल्या वेस्ट इंडिज संघातील काही खेळाडू सामना न खेळण्याचा निर्णय घेऊन संपावर जाण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडूनही संघातील काही खेळाडू पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगितले आहे.
खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडिज खेळाडूंच्या असोसिएशनमध्ये वाद सुरू आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन स्मिथने सुद्धा मंगळवारी सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली तर, काही खेळाडूंनी कोचीमध्ये होणाऱया पहिल्या सामन्यासाठीच्या सराव शिबीराला अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर वेस्टइंडिजचे खेळाडू संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
आज कुछ तुफानी करते है!
वेस्टइंडिज क्रिकेट मंडळाने सुरू असलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल भारतीय क्रिकेट मंडळाची(बीसीसीआय), आपल्या चाहत्यांची आणि इतर सर्व भागधारकांची माफी मागितली असून ही एकदिवसीय मालिका यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट मंडळाने(बीसीसीआय) वेस्टइंडिज क्रिकेट मंडळाला यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यास सांगितले आहे. वेस्टइंडिज क्रिकेट मंडळाकडून सध्या खेळाडूंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा