पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी वेस्ट इंडिजचे नेतृत्व अष्टपैलू ड्वेन ब्राव्होकडे सोपविण्यात आले आहे. डॅरेन सॅमीकडे कसोटी आणि ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.
या वर्षी कॅरेबियन भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वे संघाने वेस्ट इंडिजला ‘व्हाइट वॉश’ देण्याची किमया साधली होती. या पाश्र्वभूमीवर सॅमीऐवजी ब्राव्होकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. २९ वर्षीय ब्राव्होने २००४मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. आतापर्यंत १३७ सामन्यांत २३११ धावा आणि १६० बळी त्याच्या खात्यावर आहेत. नाबाद ११२ या त्याच्या सर्वोच्च धावा आहेत, तर ४३ धावांत ६ बळी ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. दुखापतीमुळे किरॉन पॉवेलचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही.
वेस्ट इंडिजचा संघ :
ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्लीस, ख्रिस गेल, जेसॉन होल्डर, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड, रवी रामपॉल, केमार रोच, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युएल्स, रामनरेश सरवान, डेव्हान स्मिथ.

Story img Loader