अवघ्या क्रिकेटविश्वाचे सध्या लक्ष लागले आहे ते मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निरोप समारंभाकडे. सचिनला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही करताना दिसत आहे, जेणेकरून सचिनचा निरोप समारंभ अविस्मरणीय ठरावा. सचिनही या सामन्यात मोठी खेळी साकारण्यासाठी प्रयत्नशील असेल, जेणेकरून त्याचा अखेरचा सामनाही क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा. पण वेस्ट इंडिजचा तडाखेबंद सलामीवीर याने मात्र हा निरोप समारंभ बेसूर करू, असे व्यावसायिक प्रतिस्पध्र्यासारखे विधान केले आहे.
‘‘ सचिन हा एक महान क्रिकेटपटू आहे आणि त्याचा निरोप समारंभही दिमाखात होईल. आम्हालाही त्याने आनंदी होऊन क्रिकेट जगताचा निरोप घ्यावा असे वाटत असले तरी आम्ही त्याला सामना जिंकायला देणार नाही. दमदार कामगिरीच्या जोरावर आम्ही मालिका जिंकायचा प्रयत्न करू, यामध्ये सचिनचा निरोप समारंभ भारतीयांच्या दृष्टीने बेसूर होऊ शकतो आणि तसे करण्यासाठी व्यावसायिक प्रतिस्पर्धी म्हणून आमचा प्रयत्न असेल.’’ असे गेल म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा