मागील ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरणारा वेस्ट इंडिजचा संघ यंदा मात्र चाचपडत आहे. आणखी एका पराभवामुळे त्यांचे स्पध्रेतील अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मंगळवारी वेस्ट इंडिजचा सामना होणार आहे तो सातत्याचा अभाव असलेल्या यजमान बांगलादेशशी. या पाश्र्वभूमीवर त्यांना विजयाच्या वाटेवर परतण्याची ही चांगली संधी असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजच्या संघाने भारताविरुद्धच्या लढतीत हार पत्करली; परंतु आता बांगलादेशशी त्यांचा सामना होणार आहे. पात्रता फेरीत बांगलादेशचा संघ हाँगकाँगकडूनही हरला होता. सरस धावगतीच्या बळावर त्यांना सुपर-१० फेरीत स्थान मिळवता आले होते; परंतु मशफकीर रहिमच्या नेतृत्वाखाली संघाने ख्रिस गेलच्या विंडीजला हरवावे, अशी क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या बांगलादेशवासीयांची इच्छा आहे.
संघ
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, शिल्डन कॉट्रेल, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, सुनील नरिन, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युअल्स, क्रिश्मर सँटोकी, लेंडल सिमॉन्स आणि ड्वेन स्मिथ.
बांगलादेश : मशफकीर रहिम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुर रझाक, अल-अमिन हुसेन, अनामुल हक, फरहाद रेझा, महमदुल्ला मशरफी मोर्तझा, मोमिनुल हक, नासिर हुसेन, सबिर रेहमान, शमसूर रेहमान, शाकिब अल हसन, सोहाग गाझी, तमिम इक्बाल, झियाउर रेहमान.
थेट प्रक्षेपण-स्टार स्पोर्ट्स १,३
सामन्याची वेळ- रात्री ७ पासून

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies today take on bangladesh