India vs West indies 1st T20 : विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांची धावपळ झाली. पण दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्या या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ३४ चेंडूत नाबाद ३१ तर कृणाल पांड्याने ९ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. मात्र ३ बळी टिपणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीर जाहीर करण्यात आले.
त्याआधी सामन्यात विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या आणि भारताला ११० धावांचे माफक आव्हान दिले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी विंडीजच्या अनुभवी संघाला १०९ धावांत रोखले. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर कृणाल पांड्या आणि खलील अहमदने आपल्या टी२० कारकिर्दीतील बळीचे खाते उघडले. विंडीजकडून फॅबियन अॅलनने सर्वाधिक २७ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघे झटपट बाद झाले. पाठोपाठ ऋषभ पंतदेखील तंबूत परतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने मनीष पांडेच्या साथीने ३८ धावांची भागीदारी केली. मनीष पांडे बाद झाल्यावर आलेल्या कृणाल पांड्याने ९ चेंडूत २१ धावा करून सामना खिशात घातला. कार्तिकही ३१ धावांवर नाबाद राहिला.
विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांची धावपळ झाली. पण दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्या या जोडीने भारताला विजय मिळवून दिला.
खेळपट्टीवर स्थिरावलेला मनीष पांडे झेलबाद झाला. पिअरने स्वतःच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला आणि भारताला पाचवा धक्का दिला. मनीष पांडेने १९ धावा केल्या.
२२ चेंडूत १६ धावा करून लोकेश राहुल झेलबाद झाला आणि भारताचा चौथा गडी माघारी परतला. लोकेश राहुलला मोठी खेळी करण्याची संधी होती,पण त्याला मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे तो बाद झाला.
भारताला तिसरा धक्का बसला आणि ऋषभ पंत अवघी १ धाव काढून माघारी परतला. पंतला संयमी खेळ करणे आवश्यक होते मात्र त्याने हवेत फटका मारला आणि चौथ्या चेंडूवर बाद झाला.
चांगली कामगिरी करून आपली संघातील जागा बळकट करण्याची संधी असलेला सलामीवीर शिखर धवन ३ धावांवर बाद झाला आणि भारताने दुसरा गडी गमावला.
भारताचा कर्णधार आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करणारा रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. थॉमसने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या आणि भारताला ११० धावांचे माफक आव्हान दिले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी टिपले.
खेळपट्टीवर स्थिरावलेला फॅबियन अॅलन बाद झाला. त्याने ४ चौकार लगावत सर्वाधिक २७ धावा केल्या. पण त्याला खलील अहमदने बाद केले आणि आपला टी२० कारकिर्दीतील पहिला बळी टिपला.
विंडीज संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट पायचीत झाला. या मैदानावर टी२० विश्वचषकात त्याने शेवटच्या षटकात ४ चेंडूत ४ षटकार लगावत विंडीजला सामना जिंकवून दिला होता. पण या सामन्यात त्याला जास्त धावा करता आल्या नाही. तो ४ धावा करून बाद झाला आणि विंडीजला सातवा धक्का बसला.
विंडीजने सहावा गडी रोवमन पॉवेलच्या रूपात गमावला. त्याला ४ धावांवर कुलदीपने झेलबाद केले.
अनुभवी डॅरेन ब्राव्होकडून संयमी खेळ अपेक्षित होता. मात्र तो फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला कुलदीप यादवने ५ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे विंडीजची अवस्ठा ५ बाद ४९ झाली आहे.
IPLमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा कायरन पोलार्ड झेलबाद झाला. कृणाल पांड्याने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. पोलार्डने १ षटकार लगावत १४ धावा केल्या.
एकदिवसीय मालिकेत तडाखेबाज फलंदाजी करणारा शिमरॉन हेटमायर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ १० धावा केल्या आणि बुमराहने त्याला बाद केले.
एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू शाइ होप धावबाद झाला. धावपट्टीवर दोन खेळाडूंमध्ये गोंधळ उडाल्यामुळे तो धावबाद झाला. त्याने १४ धावा केल्या.
भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज असलेला विंडीजचा अनुभवी खेळाडू दिनेश रामदीन झेलबाद झाला. उमेश यादवने त्याचा अडसर दूर केला. त्याने २ धावा केल्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात खलील आहमद आणि कृणाल पांड्याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच, जायबंदी भुमनेश्वर कुमारच्या जागी उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे.
---
---
---
---
---