India vs West Indies 3rd ODI Live Updates : भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ४३ धावांनी विजय मिळवला. तुलनेने सोप्या वाटणाऱ्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २४० धावांत आटोपला. होपच्या शतकामुळे विंडीजने २८३ धावांपर्यंत मजल मारली होती. पण विराट कोहलीने शतक ठोकूनही भारताला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. या विजयाबरोबरच विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली असून आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या आधी विंडीजने ९ बाद २८३ धावा केल्या. शाय होपच्या ९५ धावा आणि नर्स, हेटमायर व होल्डर यांची छोटी पण उपयुक्त खेळी याच्या बळावर विंडीजने ही मजल मारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम विंडीजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फटकेबाजीने सुरुवात करणाऱ्या विंडीजचे दोनही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हेमराजने १५ तर कायरन पॉवेलने २१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शाय होपने गेल्या सामन्यातील खेळी पुढे सुरु ठेवत ९५ धावा ठोकल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पण त्याला हेटमायर (३७) आणि होल्डर (३२) वगळता कोणाची अपेक्षित साथ मिळू शकली नाही. शेवटच्या षटकांत अॅश्ले नर्स (४०) आणि केमार रोच (१५* ) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडीजला २८३ धावांपर्यंत मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात असमाधानकारक झाली. रोहित शर्मा ८ धावांवर तंबूत परतला. शिखर धवन (३५), अंबाती रायडू (२२) आणि ऋषभ पंत (२४) यांना चांगली सुरुवात मिळाली पण त्यांना त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. मधल्या फळीत महेंद्रसिंग धोनीने केवळ ७ धावा केल्या तर तळाच्या फलंदाजांपैकी भुवनेश्वर कुमारने १०, कुलदीप यादवने नाबाद १५, चहल आणि अहमदने ३-३ तर बुमराहने ० धावा केल्या. कर्णधार कोहलीने शतक झळकावत भारताला विजयाच्या नजीक नेले. पण सॅम्युअल्सने त्याला त्रिफळाचित करत भारताच्या आशा संपवल्या. विराटने ११९ चेंडूत १०७ धावा केल्या. त्यात त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला.
खलील अहमद यष्टिचित, भारताचा नववा गडी माघारी
भारताचा आठवा गडी बाद, चहल तंबूत
फिरकीपटू सॅम्युअल्सच्या गोलंदाजीवर कोहली त्रिफळाचित, सामन्याला 'वळण'
भुवनेश्वर कुमार झेलबाद, भारताला सहावा धक्का
कर्णधार विराट कोहलीने सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने या सामन्यात ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि सलग तीन एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा विक्रम केला.
क्षेत्ररक्षणात चपळता न दाखवणारा धोनी फलंदाजीत अपयशी ठरला. केवळ ७ धावा करून तो झेलबाद झाला.
फटकेबाजीने सुरुवात केलेल्या ऋषभ पंतने व्हाईड जाणारा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने अतिशय अचूकपणे ते हेरले आणि DRS च्या मदतीने पंतला बाद ठरवण्यात आले.
भारताचे शतक झाल्यानंतर रायडू बाद झाला. मॅकॉयच्या चेंडूवर बॅटच्या कडेला लागून चेंडू स्टंपवर आदळला. रायडूने २७ चेंडूत २२ धावा केल्या.
दोनही सलामीवीर माघारी परतले असले तरीही कर्णधार कोहलीने आपली लय कायम राखत अर्धशतक झळकावले. याबरोबरच त्याने भारतालाही शतकी धावसंख्या गाठून दिली.
चांगली सुरुवात मिळूनही सलामीवीर शिखर धवन मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. ३५ धावांवर खेळत असताना नर्सच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार लगावले.
कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सलामावीर रोहित शर्मा त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चेंडूत २ चौकारांसह ८ धावा केल्या.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ९ बाद २८३ धावा केल्या. शाय होपच्या ९५ धावा आणि नर्स, हेटमायर व होल्डर यांची छोटी पण उपयुक्त खेळी यांच्या बळावर विंडीजने ही मजल मारली.
दुसऱ्या सामन्यात विंडीजसाठी नायक ठरलेला शाय या सामन्यात शतक झळकावण्यात अपयशी ठरला. ९५ धावांवर असताना बुमराहने त्याला त्रिफळाचित केले. शाय होपने ६ चौकार आणि ३ षटकार खेचले.
विंडीजकडून १८८वा वन डे खेळाडू ठरण्याचा मान मिळवणाऱ्या फॅबियन अॅलन ५ धावांवर माघारी परतला. युझवेन्द्र चहलने त्याचा अडसर दूर केला.
विंडीजच्या संघाने द्विशतक पूर्ण केले. पण त्याआधीच कर्णधार होल्डर बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर राखीव खेळाडू रवींद्र जाडेजा याने त्याचा झेल टिपला. त्याने ३९ चेंडूत ३२ धावा केल्या.
रोव्हमन पॉवेल झेलबाद झाला आणि विंडीजला पाचवा धक्का बसला. रोहित शर्माने अतिशय चपळाईने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. त्याने १६ चेंडूत केवळ ४ धावा केल्या.
पहिल्या सामन्यात १०६ आणि दुसऱ्या सामन्यात ९४ धावांची तडाखेबाज खेळी करणारा शिमरॉन हेटमायर तिसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. २१ चेंडूत ३७ धावा करून फटकेबाजी करण्यास त्याने सुरुवात केली होती. पण कुलदीप यादवच्या फिरकीला तो चकला आणि धोनीने लगेचच त्याला यष्टिचित केला.
खलील अहमदने आपला सामन्यातील पहिला गडी टिपला. अनुभवी मार्लन सॅम्युअल्स ९ धावा करून तंबूत परतला. सॅम्युअल्सच्या बॅटची कड लागून आलेला चेंडूने धोनीने पकडला.
विंडीजचा दुसरा सलामीवीर कायरन पॉवेल स्लिपमध्ये झेलबाद झाला. रोहित शर्माने बुमराहच्या गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. पॉवेलने २१ धावा केल्या.
चंद्रपॉल हेमराजच्या रूपाने विंडीजचा पहिला गडी बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने हवेत उंच उडालेला चेंडू धावत जाऊन पकडला आणि आपण अजूनही तंदुरुस्त असल्याची पावती दिली. हेमराज १५ धावांवर बाद झाला.
--
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या गोलंदाजांना ३२१ धावांचा बचाव समर्थपणे करता आला नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद या त्रिकुटाला संघात स्थान मिळाले आहे.