विंडीजविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात रोहित शर्माने 162 धावांची खेळी केली. रोहित आणि अंबाती रायुडूने केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने चौथ्या सामन्यात विंडीजला विजयासाठी 378 धावांचं आव्हान दिलं. अंबाती रायुडूनेही 100 धावा काढत रोहितला चांगली साथ दिली. दरम्यान आजच्या शतकी खेळीसह रोहित शर्माच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. गेली 6 वर्ष वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा मान रोहितच्या नावे जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • वर्ष 2013 – 209 धावा
  • वर्ष 2014 – 264 धावा
  • वर्ष 2015 – 150 धावा
  • वर्ष 2016 – 171 धावा (नाबाद)
  • वर्ष 2017 – 208 धावा (नाबाद)
  • वर्ष 2018 – 162 धावा (आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या)

दरम्यान, भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितने आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने 186 डावांमध्ये 196 षटकार ठोकले आहेत. या यादीमध्ये महेंद्रसिंह धोनी 218 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला 378 धावांचं आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे विंडीजचे फलंदाज हे आव्हान कसं पार करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : सचिनला मागे टाकत रोहित ठरला षटकारांचा बादशहा