वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील २९९ धावसंख्येला तगडे आव्हान देताना इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३७३ अशी धावसंख्या उभारून ७४ धावांची आघाडी घेतली आहे. जो रूटने कारकीर्दीतील सहावे शतक झळकावत यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
अँटिग्वाच्या पहिल्या अनिर्णीत कसोटीत अर्धशतक साकारणाऱ्या २४ वर्षीय रूटने १६५ चेंडूंत नाबाद ११८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली. यात १३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. रूटने गॅरी बॅलन्स (७७) सोबत चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची बहुमोल भागीदारी उभारली.