केन विल्यमसन याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ७ बाद ३३१ धावांची मजल गाठली.
पहिल्या डावात २४ धावांनी पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडने ३ बाद १२३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. विल्यमसन याने केलेल्या नाबाद १६१ धावा तसेच त्याने जिमी नीशाम याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी केलेली ९१ धावांची भागीदारी हे न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. नीशाम याने चार षटकार व तीन चौकारांसह ५१ धावा करताना धावफलक सतत हलता ठेवला. विल्यमसन याने सहजसुंदर खेळ करताना २२ चौकारांसह नाबाद १६१ धावा केल्या. त्याने ब्रॅडली व्ॉटलिंगच्या साथीत सहाव्या विकेटसाठी ७९ धावांची भर घातली. व्ॉटलिंगने दमदार २९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने ५५ धावांमध्ये चार गडी बाद केले. जेसन होल्डर याने २६ धावांमध्ये दोन गडी बाद केले.