वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या तिरंगी मालिकेत सलामिच्या लढतीत यजमान वेस्ट इंडिज संघाने विजयी नोंद केली आहे. श्रीलंका संघावर वेस्ट इंडिज संघाने सहा विकेट्सने मात केली आहे. सामन्यात धडाकेबाज कॅरिबियन फलंदाज ख्रिस गेलने शतकी खेळी साकारली. तर, फिरकी गोलंदाज सुनील नरेनने चार विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला वेस्ट इंडिज संघाने २०८ धावांत रोखले. त्यानंतर ख्रिस गेलने १०० चेंडूंमध्ये १०९ धावांची खेळी केली. त्यामुळे लंकेचे २०९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिज संघाने अवघ्या ३७ षटकांमध्ये पार केले.

Story img Loader