उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राने बडोद्यावर केवळ सात धावांनी मात करीत पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत रोमहर्षक विजय नोंदविला. ही स्पर्धा अहमदाबाद येथे सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने २० षटकांत ४ बाद १७८ धावा केल्या. त्यामध्ये विजय झोल (६ चौकार व २ षटकारांसह ५७), केदार जाधव (६ चौकार व ३ षटकारांसह ५७) व निखिल नाईक (३०) यांचा मोठा वाटा होता. केदार देवधर (५ चौकार व ४ षटकारांसह ६०) व हार्दिक पंडय़ा (चार षटकारांसह ४४) यांनी धडाकेबाज खेळ करूनही बडोद्याचा डाव १९.५ षटकांमध्ये १७१ धावांमध्ये कोसळला. महाराष्ट्राकडून समाद फल्लाह (३/२७) व शुभम रांजणे (३/४१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. महाराष्ट्राने या सामन्यातून चार गुणांची कमाई केली. त्याआधी त्यांनी बलाढय़ मुंबई संघाला हरविले होते.
संक्षिप्त निकाल-महाराष्ट्र-२० षटकांत ४ बाद १७८ (विजय झोल ५७, केदार जाधव ५७, निखिल नाईक ३०) वि.वि. बडोदा १९.५ षटकांत सर्वबाद १७१ (केदार देवधर ६०, हार्दिक पंडय़ा ४४, समाद फल्लाह ३/२७, शुभम रांजणे ३/४१)
पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० स्पर्धा: महाराष्ट्राचा बडोद्यावर रोमहर्षक विजय
उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राने बडोद्यावर केवळ सात धावांनी मात करीत पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत रोमहर्षक विजय नोंदविला. ही स्पर्धा अहमदाबाद येथे सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने २० षटकांत ४ बाद १७८ धावा केल्या. त्यामध्ये विजय झोल (६ चौकार व २ षटकारांसह ५७), केदार जाधव (६ चौकार व ३ षटकारांसह ५७) व निखिल नाईक (३०) यांचा मोठा वाटा होता.
First published on: 23-03-2013 at 04:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West zone t20 cricket maharashtra beat baroda in very close match