राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

कुर्ला येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या ग्रीको-रोमन राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्राने त्यांचे वर्चस्व कायम राखले. १३० किलो वजनी गटात सोलापूरच्या अर्जुन साठेने, ९७ किलो वजनी गटात सांगलीच्या सतीश मुडेने तर ८७ किलो वजनी गटात सोलापूरच्या बाळू सपाटेने बाजी मारली. उन्हाच्या झळांमध्येदेखील मल्लांनी त्यांच्या एकाहून एक सरस डावांचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.

या स्पर्धेत राज्याच्या ३७ संघांमधून २७८ मल्ल सहभागी झाले होते. शनिवारपासून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत  ५५ किलो, ६० किलो, ६३ किलो, ६७ किलो, ७२ किलो, ७७ किलो, ८२ किलो, ८७ किलो, ९७ किलो आणि १३० किलोपर्यंतच्या गटांमध्ये स्पर्धा झाल्या.

१३० किलो : १. अर्जुन साठे (सोलापूर), २. तुषार वरखेडे (पुणे) ३. अनिकेत मांगडे (पुणे), सुभाष गाढवे (नगर);

९७ किलो : १. सतीश मुडे (सांगली), २. विवेक यादव (उपनगर), ३. सारंग सोनटक्के (सोलापूर), नागेशकुमार शिंदे (उस्मानाबाद);

८७ किलो : १. बाळू सापटे (सोलापूर ), २.  अभिषेक फुगे (पिंपरी चिंचवड) ३. अक्षय जाधव (पुणे), योगेश शिंदे (पुणे);

८२ किलो : १. शिवाजी पाटील (कोल्हापूर), २. मयूर गायकवाड(सांगली) ३. जयदीप जोशीलकर (कोल्हापूर), अमोल मुंढे (बीड);

७७ किलो : १. गोकुळ यादव (मुंबई उपनगर), २. सचिन खोत (सांगली) ३. सनी मेढे (नाशिक), सागर पाटील (कोल्हापूर).

Story img Loader