गतविजेत्या एअर इंडियाला उपांत्य फेरीत हतबल करणाऱ्या दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँक संघाने जेतेपदाच्या लढतीत सपशेल लोटांगण घातले. पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळ करत पीएनबीचे सर्व डावपेच निष्प्रभ ठरवताना गुरु तेग बहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पध्रेचे जेतेपद पटकावले. मलक सिंग, अयप्पा आणि राजीन कंडोल्नाच्या प्रत्येकी एका गोलमुळे रेल्वेने ३-१ असा विजय मिळवला.
कनिष्ठ संघाचा सत्कार
छत्तीसगड, रायपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉकी इंडिया कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद (ब विभाग) स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. मुंबईने सडन डेथ पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्रावर ६-५ असा विजय मिळवला होता. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत मुंबई हॉकी असोसिएशनने संघातील खेळाडूंना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.
मुंबईचा संघ : करण ठाकूर, नरेश तेलंग, श्रीकिशन चौरसिया, अय्याा वारसी, मोहित कटौते, मोहम्मद तौसीफ कुरेशी, मुकुल खिलनानी, अमीन रोगाय, रेयाज कुरेशी, प्रणित नाईक, प्रिन्स चौरसिया (कर्णधार), पीयूष जैन, दानिश कुरेशी, आतिष शिर्के, तिकाराम थकुल्ला, संतोष सिंग, कुशल मेघवाल, हेमंत फडीकर.
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्तम गोलरक्षक : करण ठाकूर (पश्चिम रेल्वे)
सर्वोत्तम आघाडीपटू : अयप्पा (पश्चिम रेल्वे)
सर्वोत्तम बचावपटू : राजविंदर सिंग (पीएनबी)
सर्वोत्तम मध्यरक्षक : बनमाली झेस (पीएनबी)
सर्वोत्तम खेळाडू : अमित रोहिदास (पश्चिम रेल्वे).