5 Big Reasons of India Defeat: बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील न्यूझीलंड व भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पुनरागमन करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे विरोधी संघाने २ गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विल यंग आणि रचिन रवींद्र चांगल्या फॉर्ममध्ये होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना यंगने ७६ चेंडूत ४८ धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी खेळली. त्याच्याशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रवींद्रने ४६ चेंडूत नाबाद ३९ धावांचे योगदान दिले. पण या कसोटीत भारताच्या पराभवाची नेमकी काय कारणं होती, जाणून घेऊया.

हेही वाचा – IND vs NZ: “पण आम्हाला ही अपेक्षा नव्हती…”, भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

नाणेफेकीचा निर्णय

बंगळुरू कसोटीतील पाचही दिवस पावसाचा थोड-अधिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकत रोहित शर्माने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इथेच मोठी चूक झाली. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर खेळपट्टी समजून घेण्यात चुकले. परिणामी संघ पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत गारद झाला. भारताच्या या मोठ्या पराभवात कुठेतरी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला, ज्याचा फटका संघाला बसला.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

पहिल्या डावात फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची कामगिरी फारच निराशाजनक होती. पहिल्या डावात भारताचे फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. इतकंच नव्हे तर या सामन्यादरम्यान ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. टीम इंडियाला जर पहिल्या डावात १५०-२०० चा आकडा आकडा गाठता आला असता तर सामन्याचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारतीय संघाला बसला मोठा धक्का, विजयानंतर न्यूझीलंड संघाने घेतली झेप, टीम इंडिया चिंतेत

पाऊस आणि हवामान

पहिल्या कसोट सामन्यात सातत्याने पाऊस आणि हवामानाचा टीम इंडियाला फटका बसला. पावसामुळे पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना उशिरा झाला. त्याचबरोबर वेळोवेळी पावसामुळे सामना थांबवावा लागला. ऋषभ पंत आणि सर्फराझ खान फलंदाजी करत असतानाही पावसाने व्यत्यय आणला. तर चौथ्या दिवशी जेव्हा भारतीय संघ ४६२ धावांवर बाद झाला आणि लगेचच न्यूझीलंड संघाचा डाव सुरू झाला. भारताने चार चेंडू टाकल्यानंतर पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला, ज्यामुळे भारताची लय बिघडली आणि भारताचा पहिल्या दिवशीच विकेट घेण्याचा मनसुबाही हवामानामुळे उधळून लावला.

हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंडचा टीम इंडियावर ऐतिहासिक विजय, किवी संघाने ३६ वर्षांनी पहिल्यांदाच भारतात जिंकला कसोटी सामना

रचिन रवींद्र आणि टीम साऊदीची भागीदारी तोडण्यात अपयशी

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली होती, पण विरोधी फलंदाज रचिन रवींद्र चांगलाच फॉर्मात दिसत होता. आपल्या संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १३४ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी खेळली. त्यामुळे विरोधी संघाला पहिल्या डावात जवळपास ३५० धावांची आघाडी मिळवता आली. याचबरोबर रचिन रवींद्रला चांगली साथ देत टीम साऊदीनेही विस्फोटक फलंदाजी केली आणि ६५ धावा केल्या. या दोघांनी मिळून १०० अधिक धावांची भागीदारी रचत सामना भारतापासून दूर नेला. तर भारतीय गोलंदाजही ही भागीदारी तोडण्यात अपयशी ठरले.

भारताच्या खालच्या फळीतील फलंदाज फेल ठरले

पहिल्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या डावात आघाडीच्या फळीतील भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र खालच्या फळीत फलंदाजीला आलेले केएल राहुल आणि रवींद्र जडेजा पंत आणि सर्फराझ खानच्या खेळी पुढे चालू ठेवतील असे वाटले होते . त्यामुळे दुसऱ्या डावात संघाला मोठी आघाडी मिळेल. पण नवीन चेंडू न्यूझीलंडने घेतल्यानंतर हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि भारतीय संघ पुन्हा मागे राहिला.