What is Electra Stump : नव्या युगातील स्टंप्सने क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० लीग ‘बिग बॅश लीग’मध्ये हे नवे स्टंप पाहायला मिळाले आहेत. त्यांना इलेक्ट्रा स्टंप असे नाव देण्यात आले आहे. या स्टंपचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौकार-षटकारांपासून नो बॉलपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतील. हे सर्व रंग देखील अतिशय आकर्षक दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौकार किंवा टाइम आऊटनंतरही रंग बदलणार –

‘इलेक्ट्रा’ स्टंपने बिग बॅश लीग (बीबीएल २०२३) मध्ये पदार्पण केले आहे, जे पूर्वी महिला बीबीएलमध्ये वापरले गेले होते. अंपायरचा निर्णय सूचित करण्यासाठी हे स्टंप वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि रंगांच्या संयोजनात चमकतात. हे निर्णय नो-बॉल, विकेट, बाऊंड्री किंवा षटकांमध्‍ये टाईम आऊटचे देखील आहेत.

शुक्रवारी (२२ डिसेंबर) बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंपबद्दल तपशीलवार माहिती दिली. मायकेल वॉनने सांगितले की, हे स्टंप महिलांच्या बिग बॅशमध्ये वापरले गेले आहेत, परंतु पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यानंतर मार्क वॉने या स्टंपची वैशिष्ट्ये सांगितली.

हेही वाचा – IND vs SA Test : ‘डाव्या हाताच्या गोलंदाजांसमोर त्याची कमजोरी…’, संजय मांजरेकरांचे रोहित शर्माबद्दल मोठे वक्तव्य

विकेट: कोणताही खेळाडू बाद झाला, मग तो कोणत्याही प्रकारे आऊट झाला तरी या स्टंपमध्ये लाल लाईटीसह ज्वाळांसारखे रंग दिसतील.

चौकार: चेंडू बॅटला लागून सीमारेषेला स्पर्श करताच, या स्टंपमध्ये विविध प्रकारच्या लाइट्स वेगाने सरकताना दिसतील.

षटकार: जेव्हा चेंडू बॅटला लागल्यानंतर थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो, तेव्हा या स्टंपवर वेगवेगळे रंग सरकताना दिसतील.

हेही वाचा – IND vs SA : स्टार फलंदाजाने घेतला मोठा निर्णय! कसोटी मालिकेनंतर होणार निवृत्त

नो बॉल: नो बॉलसाठी अंपायरच्या इशाऱ्यानंततर या स्टंपवर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लाइट्स सकरताना दिसतील.

षटकांदरम्यान: एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक सुरु होईपर्यंत जांभळ्या आणि निळ्या लाइट स्टंपवर चालू राहतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are electra stumps introduced in bbl 2023 which change colours at different events during match vbm