BCCI New rules for Indian Cricketers : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीसीसीआयने विशेषत: शिस्तीबाबत काही कठोर नियम केले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियासाठी १०-नियाम लागू केले आहे, जे प्रत्येक खेळाडूला पाळणे अनिवार्य असेल. याशिवाय बीसीसीआयने भारतीय संघातील स्टार कल्चरही बंद करण्यावर भर दिला आहे. ते १० नियम कोणकोणते आहेत? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळणे बंधनकारक –

भारतीय संघात अनेक दिवसांपासून स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्यां खेळाडूंचा समावेश आहे. असे खेळाडू फक्त टीम इंडिया आणि आयपीएलसाठी उपलब्ध राहतात. त्यामुळे आता सर्व वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे.

२. कुटुंब एका मर्यादेपर्यंतच सोबत राहू शकते –

जर एखादा खेळाडू ४५ दिवस परदेशी दौऱ्यावर राहिला, तर त्याची पत्नी आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले दोन आठवडे त्याच्यासोबत राहू शकतात. या कालावधीत बीसीसीआय फक्त त्यांच्या राहण्याचा खर्च उचलेल. मुदत संपल्यानंतर खेळाडू त्याच्या कुटुंबाचा खर्च उचलेल.

हेही वाचा – MS Dhoni Coin : एमएस धोनीच्या सन्मानार्थ सरकार सात रुपयांचे नाणे आणत आहे? काय आहे सत्य? जाणून घ्या

३. सर्व खेळाडूंना सराव सत्रात हजर राहावे लागेल –

आता सर्व खेळाडूंना नियोजित सराव सत्राच्या संपूर्ण कालावधीसाठी सराव सत्रात राहावे लागणार आहे. या नियमानुसार आता कोणताही खेळाडू सराव पूर्ण करून मैदान सोडू शकत नाही.

४. अतिरिक्त सामान नेण्यासाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही –

आता सर्व खेळाडूंना परदेशी दौरे आणि देशातील मालिकांमध्ये अतिरिक्त सामान नेण्याची परवानगी नसेल, ज्यामध्ये त्यांना बीसीसीआयने ठरवून दिलेल्या मर्यादेचे पालन करावे लागेल. जर एखाद्या खेळाडूने अतिरिक्त सामान नेले तर त्याला स्वतःचा खर्च उचलावा लागेल.

५. वैयक्तिक कर्मचारी घेण्यावर बंदी घातली –

टीम इंडियाच्या काही खेळाडूंबाबत असे वृत्त आले होते की ते त्यांच्या वैयक्तिक स्टाफला सोबत घेऊन जातात, आता बीसीसीआयने यावर पूर्णपणे बंदी घातली आहे, ज्यामध्ये त्यांनी वैयक्तिक व्यवस्थापक, आचारी, सहाय्यक आणि वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : ‘भारतात खेळण्याची उणीव भासेल…’, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पण दुबईत…’

६. सेंटर ऑफ एक्सलन्सला काहीही पाठवण्यापूर्वी खेळाडूंना संघ व्यवस्थापनाला कळवावे लागेल –

खेळाडूंना आता बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सला स्वतंत्र बॅग पाठवाव्या लागतील किंवा कोणतीही उपकरणे आणि वैयक्तिक वस्तू पाठवण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला कळवावे लागेल. वेगवेगळ्या व्यवस्थेमुळे कोणताही अतिरिक्त खर्च झाल्यास त्याची जबाबदारी खेळाडूची असेल.

७. मालिकेदरम्यान खेळाडूंना जाहिराती शूट करता येणार नाहीत –

आता भारतीय संघाचा कोणताही खेळाडू कोणत्याही मालिकेदरम्यान जाहिराती शूट करू शकणार नाही. बीसीसीआयने आपल्या नवीन नियमातही याबाबत स्पष्ट केले आहे. केवळ त्या मालिकेवर किंवा दौऱ्यावर खेळाडूंचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा – Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल

८. खेळाडूंसोबत कुटुंबांना एकत्र प्रवास करता येणार नाही.

खेळाडू संघासोबत फक्त सामने आणि सराव सत्रांसाठी प्रवास करू शकतील. यामुळे संघातील एकता प्रभावी ठरेल, असा विश्वास बीसीसीआयला आहे. मात्र, काही कारणास्तव एखाद्या खेळाडूचे कुटुंब त्याच्यासोबत प्रवास करणार असेल, तर प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची परवानगी घ्यावी लागेल.

९. बीसीसीआयच्या अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक –

आता सर्व खेळाडूंना बीसीसीआयच्या अधिकृत शूट आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल. बीसीसीआयच्या स्टेकहोल्डर्सशी बांधिलकी राखण्यासाठी आणि खेळाला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारी आवश्यक आहेत.

हेही वाचा – BBL Stadium Fire : सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये लागली आग; अंपायर्सनी तात्काळ थांबवला सामना, VIDEO व्हायरल

१०. मालिका संपल्यानंतरच खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी –

आता कोणत्याही खेळाडूला सामना किंवा मालिका संपल्यानंतर लवकर घरी परतण्याची परवानगी दिली जाणार नाही, त्यांना दौरा संपल्यानंतर परत यावे लागेल, जरी सामना नियोजित वेळेपूर्वी संपला तरीही संघासोबत रहावे लागणार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the 10 point disciplinary guidelines that bcci has introduced for indian cricketers vbm