ECB action on Feroze Khushi used oversized bat : फलंदाज बॅटच्या बळावर संघाला जिंकून देतात पण इंग्लडमध्ये फलंदाजाने वापरलेली बॅट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नियमबाह्य अशा बॅटमुळे अख्ख्या संघालाच दंड ठोठावण्यात आला आहे. या खेळाडूचे नाव फिरोज खुशी आहे. फिरोज खुशी इसेक्सकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. फिरोजने नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या सामन्यात नियमबाह्य असलेली बॅट वापरली, ज्यामुळे त्याचा फटका संघाला बसला. त्यामुळे आज आपण बॅट किती रुंद आणि जड असावी लागते? याबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसेक्स संघाला १२ गुणांचा फटका बसला –

इसेक्सने नॉटिंगहॅमशायरला हरवून २० गुण मिळवले होते, पण फिरोज खुशीने नियमबाह्य बॅटचा वापर केल्यामुळे १२ गुण वजा करण्यात आले. आता इसेक्स संघ ५६ गुणांवर असून ससेक्सपेक्षा ५६ गुणांनी मागे आहे. मात्र, इसेक्सने या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. इसेक्सचे म्हणणे आहे की त्यांना याची माहिती नव्हती आणि त्यांनी बॅट कंपनीशी चर्चा केली आहे.

काय म्हणाला फिरोज खुशी?

फिरोज खुशीने आपली बॅट तपासली नाही, असा युक्तिवाद केला. त्याने त्याच्या बॅट उत्पादक कंपनीवर विश्वास ठेवला, ज्याने त्याला चांगली बॅट दिली. ‘आम्ही सर्व नियमांचं पालन करतो आणि ही चूक जाणीवपूर्वक झालेली नाही’, असं इसेक्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तथापि, २०२२ मध्ये देखील डरहम संघाचे १० गुण कमी करण्यात आले होते. त्यावेळी डरहमचा फलंदाज निक मॅडिन्सननेही मोठ्या आकाराची बॅट वापरली होती.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल

काय आहेत बॅटचे नियम?

क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या एमसीसीनुसार, बॅटची लांबी ३८ इंच पर्यंत असावी लागते. तसेची बॅटची रुंदी ४.२५ इंचांपेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर बॅटच्या कडा १.५६ इंचांपेक्षा जास्त नसाव्यात आणि बॅटचे वजन ३ पौंडांपेक्षा (जवळपास १३०० ग्रॅम) जास्त नसावे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the bat size limits as per mcc 12 points penalty to essex for feroze khushi used oversized bat in county cricket vbm