“कोणताही क्रिकेटर परफेक्ट नसतो, पण जर कोणी परिपूर्णतेच्या जवळ असेल तर हरभजन सिंगच्या डोळ्यासमोर एकच नाव येते आणि ते म्हणजे सचिन तेंडुलकर,” असे त्याने एका कार्यक्रमात सांगितले. हरभजन आणि चाहत्यांच्या लाडक्या सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे विक्रम केले आहेत, जे मोडणे फार कठीण आहे. २०० कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि धावा करण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन २४ एप्रिलला ५० वर्षांचा झाला आहे.

हरभजनने तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसापूर्वी पीटीआयला सांगितले की, “पाजी (जसे तेंडुलकरला त्याचे कनिष्ठ सहकारी म्हणतात) हा क्रिकेटपटू कदाचित परिपूर्णतेच्या अगदी जवळ आहे. ते निश्चितच एक व्यक्ती म्हणून एक आदर्श आहेत आणि आपल्या देशात त्यांचे असंख्य समर्थक असून ते त्यांना क्रिकेटचा देव मानतात. देवासारखी स्थिती असूनही सन्मानाने आणि नम्रतेने जीवन कसे जगायचे याचे एक उज्ज्वल उदाहरण आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.”

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Paris Paralaympics 2024 Sheetal Devi India Armless Archer Broke World Record in Archer With Incredible 703
Paris Paralympics: हाताविना तिरंदाजी करणाऱ्या शीतल देवीची पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक सुरूवात, अवघ्या एका गुणाने हुकला विश्वविक्रम, पाहा VIDEO

मुलाखत घेणाऱ्या त्या सूत्रसंचालकाने तेंडुलकरसोबतच्या आठवणी शेअर करायला सांगितल्यावर हरभजन हसला. तो म्हणाला, “बऱ्याच आठवणी आहेत. त्यांनी माझ्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्याच्याशी निगडित अनेक वैयक्तिक आणि भावनिक आठवणी आहेत, ज्या मी माझ्या कथेसाठी राखून ठेवेन, परंतु तरीही त्यातील काही मी तुमच्याशी शेअर करू शकतो.”

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय दिग्गजांसाठी सचिन देवदूत! हा मनोरंजक किस्सा तुम्हाला माहीत आहे का?

हरभजन सचिनबाबतील किस्सा सांगताना म्हणाला, “तेंडुलकरची प्रतिभा समजून घेण्यासाठी एक छोटीशी कथा पुरेशी असेल. २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषकादरम्यान, पाजीने एकही दिवस नेटमध्ये फलंदाजी केली नाही. भारतीय गोलंदाजी आक्रमण विश्वचषकात चांगली कामगिरी करत होते, पण जवागल श्रीनाथ, आशिष नेहरा, झहीर खान, अनिल कुंबळे किंवा मी त्यांना स्पर्धेदरम्यान नेटमध्ये एकही चेंडू टाकला नाही.”

हेल्मेटवरून माझ्यावर चिडले होते पाजी- हरभजन

भज्जीने सांगितले की, “पाजीला हेल्मेट लहान होते की मोठे हे चेक करायचे होते त्यामुळे ते मान हलवत होते. पण मला वाटले की ते मला बोलवत आहेत म्हणून मी त्यांच्या जवळ दोन ते तीनवेळा गेलो.” त्यानंतर महान भारतीय ऑफस्पिनरने खुलासा केला की. “सचिनने त्यावेळी मोठ्या आकाराचे हेल्मेट घातले होते आणि ते व्यवस्थित डोक्यात फिट होत की नाही हे पाहण्यसाठी त्याला डोके वरपासून खालपर्यंत हलवावे लागत होते.”

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: “तांत्रिकदृष्ट्या कोणीही श्रेष्ठ…”, कोहली-तेंडुलकरच्या तुलनेवर पॉटिंगचे सूचक विधान

सचिनने त्या स्पर्धेत ६७३ धावा केल्या, त्यात सेंच्युरियन येथे पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक ९८ धावांचा देखील समावेश होता. त्याखेळीत सचिनने शोएब अख्तरला षटकार मारला होता. हरभजन म्हणाला, “त्यावेळी आजच्यासारखे थ्रो-डाउन मशीन नव्हते, परंतु आमच्याकडे एक व्यक्ती श्यामल जो १८ वर्षाचा होता आणि तो पाजीला गोलंदाजी करत असे.” तो २० यार्ड आणि कधीकधी १६ यार्ड्सवरून गोलंदाजी करत असे. असा पाजी तासनतास असाच सराव करायचे. मला हे पाहून राग आला आणि मी भडकलो. म्हणालो, “ तुम्ही आम्हाला नेटमध्ये गोलंदाजी करू देत नाहीत मग त्याच्याकडून का सराव करून घेत आहात.” यावर सचिनने सांगितले की, “मला या विश्वचषका दरम्यान सराव करून घायचा आहे पण याबाबत मी माझ्या मनाशी वेगळे काहीतरी ठरवले आहे. त्यांनी त्यांच्या फलंदाजीने सर्वांना उत्तर दिले.”