IND vs AUS Nathan Lyon sledging to KL Rahul video viral : मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याची पहिल्या दिवसापासूनच रोमांचक ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटीबद्दल चाहत्यांमध्ये जितकी उत्सुकता होती, तितकाच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्यात मसाला टाकला. पहिल्या दिवशी विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कॉन्स्टासशी झालेली धक्काबुकी वादग्रस्त ठरली, तर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने केएल राहुलला सलामीतून हटवल्याने चर्चेचा विषय ठरला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा स्लेजिंगचा मुद्दा नेहमीच तापतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला सर्वबाद ४७४ धावांवर रोखले. यानंतर भारतीय संघाच्या डावाची सलामी कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलच्या जागी यशस्वी जैस्वालसह दिली. मात्र, रोहित शर्मा काही खास करु शकला नाही आणि स्वस्तात परतला. यानंतर केएल राहुल फलंदाजी आला, ज्याला ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नॅथन लायनने डिवचण्याचा प्रयत्न केला.

नॅथन लायनने केएल राहुलला डिवचले –

भारत अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर –

फलंदाजीदरम्यान केएल राहुलला डिवचण्यासाठी नॅथन लायनने रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कांगारू संघाच्या फिरकीपटूने केएलला विचारले, ‘तू अशी कोणती चूक केलीस की तुला ओपनिंग ऐवजी वन डाऊनला यावे लागले. मला सांग तू काय चूक केलीस?’ या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारत अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर आहे. दुसरा दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. तिन्ही सत्रात कांगारूंनी भारतीय संघावर वर्चस्व राखले.

हेही वाचा – IND vs AUS : ‘तोंडावर कोण थुंकलं होतं…’, विराटवर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आणि मीडियाला इरफान पठाणने दाखवला आरसा

शेवटच्या सत्रात कोहली-जैस्वाल फलंदाजी करत असताना, भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा होती. यानंतर टीम इंडियाने अवघ्या सहा धावात आणखी तीन विकेटिस गमावल्या. यशस्वी जैस्वालचा रनआऊट हा टर्निंग पॉइंट ठरला. यशस्वीने कोहलीसोबत १०२ धावांची भागीदारी केली. मात्र, यशस्वी रनआऊट होताच भारताचा डाव गडगडला. त्याला ८२ धावा करता आल्या. यानंतर विराट कोहली ३६ धावा करून बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन आकाश दीपही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did you do wrong to bat one down nathan lyon sledging to kl rahul during ind vs aus 4th test vbm