आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप कोणाची हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Fantasy Sports Platform Dream 11 या ब्रँडने २२२ कोटी रुपये मोजत तेराव्या हंगामाची स्पॉन्सरशिप मिळवली आहे. भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं होतं. बीसीसीआयनेही आयपीएलचे स्पॉन्सर असलेल्या VIVO या चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा अशी चाहत्यांची इच्छा होती. जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला. VIVO आणि IPL यांच्यात ५ वर्षांसाठी २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटींचा निधी देत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण भारत आणि चीन यांच्यातले संबंध पुढील वर्षांपर्यंत तणावाचे राहिले आणि VIVO ने पुढील हंगामाला स्पॉन्सरशिप देण्यास नकार दिला तर Dream 11 चा करार पुढील ३ वर्षांसाठी म्हणजे २०२२ पर्यंत कायम राहणार आहे. बीसीसीायमधील विश्वसनीय सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. तेराव्या हंगामासाठी Dream 11 बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजणार आहे. आणि इतर दोन हंगामात VIVO ने परत येण्यासाठी नकार दिल्यास Dream 11 त्या हंगामासाठी बीसीसीआयला २३४ कोटी रुपये मोजणार आहे. दोन भारतीयांनी सुरु केलेल्या या स्टार्ट-अप ब्रँडला नंतर चांगलाच प्रतिसाद मिळायला लागला. Dream 11 मध्ये एका चिनी कंपनीची गंतवणूक असली तरीही ब्रँडची मुख्य मालकी ही भारतीयांकडेच असल्यामुळे हा मुद्दा चर्चेतून सोडवला जाऊ शकतो असं बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पष्ट केलंय.

Dream 11 च्या स्पॉन्सरशिपमुळे डिजीटल माध्यमांमध्ये आयपीएलचा चाहतावर्ग अजुन वाढेल अशी बीसीसीआयला आशा आहे. करोनामुळे बीसीसीआयसमोर तयार झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा फायदा होईल असा विश्वास बीसीसीआयला आहे. VIVO प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला देत असलेल्या रकमेपेक्षा Dream 11 मोजत असलेली रक्कम ही जवळपास अर्धी आहे. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत ही रक्कम चांगली असल्याचंही बीसीसीआयमधील सूत्रांचं म्हणणं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये रंगणार आहे.