एकदिवसीय विश्वचषक २०११च्या चॅम्पियन संघाचे खेळाडू पुन्हा एकत्र का खेळले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाने २०११ मध्ये अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक तब्बल २८ वर्षांनी जिंकला होता. भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, खराब फॉर्म आणि दुखापतींमुळे २०११चा विश्वचषक जिंकणारी प्लेइंग इलेव्हन भारतासाठी पुन्हा सामना खेळू शकला नाही. एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. भारतासाठी विजेतेपद मिळविणाऱ्या या संघातील खेळाडू पुन्हा कधीही एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळले नाहीत. १५ सदस्यांपैकी केवळ चार खेळाडू २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळले होते. इतर खेळाडूंना पुन्हा एकत्र खेळण्याची संधी मिळालीच नाही.

न्यूज २४शी केलेल्या संवादात फिरकीपटू हरभजन म्हणाला की, “संघ पुन्हा एकत्र का खेळला नाही? हे मला अजूनही माहीत नाही.” तो म्हणाला की, “मला माहित नाही की संघ पुन्हा एकदाही एकत्र खेळला नाही. माझ्यासाठीही ते एक गूढच आहे.” त्याच्यासाठीही एक आश्चर्याची बाब असल्याचे भज्जीने सांगितले.

हेही वाचा: Virat Kohli: “विराट हा अनेकांचे प्रेरणास्थान पण…”, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे कोहलीबाबत मोठे विधान; पाहा video

माजी खेळाडू हरभजन सिंग म्हणाला की, “आपण एकत्र येऊन विश्वचषक खेळलो ही अभिमानास्पद बाब आहे. आम्ही त्यात चांगली मजा केली कुठलेही हेवे-दावे नव्हते. असे असतानाही दुर्दैवाने संघ पुन्हा एकत्र आलेला नाही. संघाने एकही स्पर्धा एकत्र खेळली नाही, एकही सामना खेळला नाही.” हरभजन म्हणाला की, “अनेक मॅच विनिंग खेळाडू होते पण त्यांना संघात स्थान का देण्यात आले नाही हे माझ्यासाठी एक कोडचं आहे.”

“२०११च्या विश्वचषकापर्यंत संघ खूप चांगला होता, मग वर्ल्डकप जिंकवून देणारे खेळाडू अचानक खराब कसे झाले की त्यातील इतरांना परत संघात संधीच दिली नाही.” हरभजन तत्कालीन संघ व्यवस्थापनावर भडकला. पुढे तो म्हणाला, “यानंतर अचानक संघात बरेच बदल झाले. सामने जिंकणारी खेळाडू आता बाहेर होते. त्यातील असे काही खेळाडू ठरले ज्यांच्या तो शेवटचा विश्वचषक सामना ठरला. मात्र, त्यातील असे बरेच खेळाडू होते जे जास्त काळ खेळू शकले असते. आम्ही सिनिअर होतो पण खेळू शकत होतो. आम्हाला म्हातारे म्हणणारे तुम्ही फार काय तरुण होते का? ” असे म्हणत अप्रत्यक्षपणे एम.एस.धोनीवर निशाना साधला.

हेही वाचा: Dope Test: धक्कादायक! दोन वर्षात केवळ ११४ क्रिकेटपटूंची डोप टेस्ट; रोहित शर्मा आघाडीवर, कोहलीसह अनेक स्टार्स अजूनही…

विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मुंबईत श्रीलंकेचा पराभव केला. धोनी आणि गौतम गंभीरने मिळून आपल्या धडाकेबाज फलंदाजीने विजय मिळवला. भारतीय संघाचा वनडेमधला हा दुसरा विश्वचषक होता. यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी मिळाली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened to the 2011 world cup champion team harbhajan singh was also shocked said yes we were old but active avw