Champions Trophy What happens if AUS vs SA gets washed out in Rawalpindi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आज २५ फेब्रुवारीला ब गटातील महत्त्वाच्या लढतीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमनेसामने असणार आहेत. आधीच्या अंदाजाप्रमाणे पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने हे २.३० वाजता सुरू होतात, त्यामुळे २ वाजता नाणेफेक होते. पण भारतीय वेळेनुसार एक तास होऊन गेल्याने अद्याप नाणेफेक झालेली नाही. त्यामुळे पावसामुळे जर हा सामना रद्द झाला तर काय होणार? कोणाला याचा फायदा होणार, जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील अ गटातील दोन संघ आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. अ गटात भारत, न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान हे चार संघ होते. त्यांच्यापैकी भारत आणि न्यूझीलंडने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉपी २०२५ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ स्पर्धेतून गट टप्प्यातूनच बाहेर झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा ब गटातील सामन्यांवर आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत खूप महत्त्वाची आहे. पण पावसामुळे या सामन्याच्या निकालाबाबत अनिश्चितता आहे.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना ICC च्या नियमांनुसार प्रत्येकी एक गुण मिळेल. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ समान ३ गुणांवर असतील (एक विजय आणि एक सामना रद्द). दोन्ही संघ गुणांवर बरोबरीत असूनही, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत जास्त रन रेटसह पहिल्या स्थानी असेल. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट हा +२.१४० आहे , तर ऑस्ट्रेलियाचा रन रेट +०.४७५ आहे.

कसं असणार दोन्ही संघांच सेमीफायनलचं समीकरण?

दक्षिण आफ्रिकेचा संघ आपला पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी मजबूत स्थितीत असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलिया तरीही सेमीफायनलच्या शर्यतीत असेल, पण त्यांना पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांचा गट टप्प्यातील अंतिम सामना जिंकण्याची आवश्यकता असणार आहे.

इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे सध्या ० गुण आहेत, जर त्यांनी त्यांचे उर्वरित सामने जिंकले तर त्यांनाही सेमीफायनलसाठी पात्र होण्याची संधी मिळेल. गट सामने संपल्यानंतरही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोघांचे प्रत्येकी ३ गुण असतील तर त्यांची पात्रता इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल.

Story img Loader