What is the Irani Cup competition in domestic cricket : बीसीसीआयने इराणी चषक २०२४ साठी सध्याच्या रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ च्या संघांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने येणार आहेत. ‘रेस्ट ऑफ इंडिया’चा कर्णधार ऋतुराज गायकवाड तर अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्त्व करणार आहे. हा सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी इराणी कप म्हणजे काय आहे आणि त्याचा इतिहास? जाणून घेऊया.

इराणी कप म्हणजे काय?

इराणी चषक, ज्याला इराणी करंडक म्हणूनही ओळखले जाते, हा भारतात दरवर्षी खेळला जाणारा वार्षिक प्रथम-श्रेणी सामना आहे, जो त्या मोसमातील रणजी करंडक चॅम्पियन संघाचा सामना रेस्ट ऑफ इंडिया संघाविरुद्ध होतो. रेस्ट ऑफ इंडिया संघात रणजी करंडक चॅम्पियन संघाव्यतिरिक्त भारतातील विविध राज्यांतील सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली जाते. ही निवड बीसीसीआयकडून केली जाते. बीसीसीआयने इराणी चषकाचे नाव दीर्घकाळ कार्यरत असलेले अध्यक्ष आणि खजिनदार झेट आर. इराणी यांचे नाव दिले. १९२८ मध्ये बीसीसीआयच्या स्थापनेपासून ते १९७० मध्ये मृत्यूपर्यंत इराणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Devendra Fadnavis sworn in as twenty first Chief Minister of Maharashtra on 5 December 2024
विधानसभेची नवी दिशा

इराणी कपचा इतिहास काय आहे?

इराणी चषकाचा पहिला हंगाम मार्च १९६० मध्ये रणजी ट्रॉफीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून खेळवण्यात आला. जरी, सुरुवातीला बीसीसीआयचा या प्रकारचा सामना दरवर्षी आयोजित करण्याचा हेतू नव्हता, परंतु १९६२-६३ मध्ये मंडळाने हा सामना दरवर्षी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन हंगामात (१९५९-६०, १९६२-६३ आणि १९६३-६४), हा सामना भारतीय क्रिकेट देशांतर्गत हंगामाच्या शेवटी खेळला गेला, परंतु १९६५-६६ च्या हंगामात, बीसीसीआयने, त्याची प्रतिष्ठा ओळखून, भारतीय क्रिकेटच्या नवीन देशांतर्गत हंगामातील पहिला सामना म्हणून त्याची सुरुवात केली.

हेही वाचा – MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल

२०१२-१३ इराणी चषक हंगाम नवीन हंगामाची सुरूवात म्हणून खेळला गेल होता, परंतु २०१३ मध्ये, रणजी ट्रॉफी फायनल संपल्यानंतर लगेचच तो आयोजित करण्यात आला, ज्यामुळे २०१२-१३ हंगामात दोन इराणी कप सामने खेळले गेले. तेव्हापासून रणजी ट्रॉफीच्या फायनलनंतर लगेचच हा सामना खेळवला जाऊ लागला. इराणी चषक २०१९ पर्यंत त्याच पद्धतीने सुरू असला तरी, कोविड -१९ नंतर परिस्थिती बदलली आणि पुढील दोन हंगामात एकही सामने खेळले गेले नाहीत. म्हणून, २०२२ मध्ये बीसीसीआयने २०१९-२० आणि २०२२-२३ या हंगामासाठी इराणी चषक आयोजित केला होता. २०२४ मध्ये नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर ही दुसरी स्पर्धा आहे, याआधी २०२४-२५ हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने झाली होती.

Story img Loader