Rohit Sharma Lamborghini Urus Blue Car Price and number : भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय कर्णधाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लॅम्बोर्गिनी कारमधून जात असताना, रोडवर एका महिला चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यामुळे आता रोहित आणि त्याची निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार चर्चेत आहे. त्याच्या या कारची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल, चला तर मग त्याच्या अलिशान कारची किंमत किती आहे? जाणून घेऊया.

रोहितच्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत काय आहे?

कर्णधार रोहित शर्मा त्याच्या लॅम्बोर्गिनी कारमधून रोडवर आपल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेत आला आहे. खरं तर, जेव्हा रोहित मुंबईतील प्रशिक्षण सत्रानंतर परत येत होता, तेव्हा तो निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये दिसला होता, ज्याची किंमत ऐकून तुम्ही चकित होऊ शकता. रोहित शर्माने २०२२ मध्येच लॅम्बोर्गिनी उरुस नावाची कार खरेदी केली आहे. भारतात या कारची किंमत सुमारे ३.१५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे रोहितच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स

रोहितच्या लॅम्बोर्गिनी कारचा नंबर काय आहे?

ही लॅम्बोर्गिनी कार देखील खूप खास आहे. कारण तिचा नंबर ०२६४ आहे. रोहित शर्माने हा नंबर आवर्जून घेतला आहे कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या २६४ आहे. रोहितने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची इनिंग खेळली होती. मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनी उरुस कार चालवताना रोहितला अनेकवेळा पाहिले गेले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : IND vs BAN टी-२० मालिका सुरु असतानाच रोहितने केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

रोहित शर्माचे कार कलेक्शन –

रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे BMW M5 Formula 1 Edition आहे, ही एक स्पोर्ट्स कार आहे जिची भारतात किंमत १.७३ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे मर्सिडीज GLS 400D देखील आहे, ज्याची बाजारातील किंमत १.२ कोटी रुपयांपासून सुरू होते. तसेच त्याच्याकडे BMW X3 आणि Toyota Fortuner ची 2 SUV कार देखील आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे ६२ लाख आणि ३३ लाख रुपये आहे. भारतीय कर्णधाराच्या कारच्या यादीत सर्वात स्वस्त कार स्कोडा कंपनीची आहे, जी त्याने १२.५ लाख रुपयांना खरेदी केली होती.

Story img Loader