Ranji Trophy 2024: मुंबई क्रिकेट संघाने बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक जिंकत मुंबईच्या शिलेदारांनी ऐतिहासिक कामगिरीच केली, पण मिळवणं साधं आहे. गेल्या दहा महिन्यांचे काटेकोर नियोजन, रणनीती आणि कठोर परिश्रम यांचे फळ म्हणजे हा विजय आहे. ४६ बैठका आणि बंगळुरूजवळील अलूर येथे पूर्व-हंगामी निवासी शिबिरापासून ते विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी डान्स आणि गाण्यांच्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांनी भरलेला हा प्रवास मजेशीर आणि खूप शिकवून जाणारा असा होता.

भारताचा अनुभवी आणि वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे मुंबई संघाच्या मोहिमेचा चेहरा होता. पण त्याच्यासोबतच अनेक शिलेदार होते, ज्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या जसे की प्रशिक्षक ओंकार साळवी. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला त्यांचा भाऊ माजी वेगवान गोलंदाज अविष्कार यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करायचे होते. पण त्यांचे बंधू ओंकार साळवी प्रशिक्षक झाले. त्यांच्याकडे प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव नाही. रेल्वेसाठी ते एकमेव लिस्ट ए सामन्यात खेळले. पण त्यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबईसाठी फलदायी ठरला.

लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन

मुंबई संघाचे प्रशिक्षक साळवी यांनी एखाद्या बॉलिवूडमधील चित्रपटापतील नाट्यमय कथानकाशी या मोहिमेची तुलना केली आणि खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते कायमच तत्पर होते.मुंबईच्या संघात संपूर्ण मोहिमेदरम्यान अनेक हिरो होते, आपला अखेरचा रणजी सामना खेळत असलेला दिग्गज धवल कुलकर्णी आणि मुख्य फलंदाज भूपेन लालवाणीपासून ते मालिकावरी तनुष कोटियन आणि सर्वाधिक बळी घेणारा मोहित अवस्थी. मुशीर खान आणि शार्दुल ठाकूर हे तर अंतिम आणि उपांत्य फेरीतील शतकवीर ज्यांनी मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला.

हेही वाचा: Ranji Trophy 2024: ‘धवल’ कारकीर्दीची तळपती अखेर

मुंबईच्या यशाच्या केंद्रस्थान नियोजन आणि टीम बाँडिंग होते. “आमचे नियोजन जून (२०२३) मध्ये सुरू झाले. आम्ही शिबिरात कौशल्य आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करत होतो. अलूरमध्ये संघाचे १५ दिवसांचे निवासी शिबिर आयोजित केले होते, यामुळे आम्हाला खेळाडूंना समजून घेत त्यांच्याशी एक बॉन्डिंग तयार करण्याची संधी मिळाली. खेळाडूंना एकमेकांच्या यशाचा आनंद लुटता यावा यासाठी आम्हाला निवांत आणि मैत्रीचे वातावरण (भाई-चारा वाला माहौल) हवे होते,” असे साळवी यांनी सामन्यानंतर सांगितले.

मुंबईचा संघ नेहमी एकत्र जेवणासाठी बसत असे. ऑफ-डेजमध्ये संघ व्यवस्थापन खेळाडूंसाठी मैदानाबाहेरील कार्यक्रमांचे जसे की गायन आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करत असतं. संघात साळवी, रहाणे, धवल कुलकर्णी आणि डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणी यांचा एक कोअर कमिटी गट तयार करण्यात आला.

हेही वाचा : IPL 2024: पॅट कमिन्स चालवणार शेन वॉर्नचा वारसा? ट्वेन्टी२० प्रकारात पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत

संघ प्रशिक्षक साळवी पुढे म्हणाले, “प्रत्येक खेळाडूची ओळख झाली आणि वरिष्ठ खेळाडूंना विविध भूमिका देण्यात आल्या. आमच्याकडे एक कोअर कमिटी होती ज्यामध्ये धवल वेगवान गोलंदाजी युनिट पाहत असे, अज्जू (रहाणे) फलंदाजी बाजूची काळजी घेत असे, तो सर्वांसाठी मोठ्या भावासारखा होता.तर शम्स फिरकी विभागावर लक्ष ठेवून होता,”

संघ योग्य मार्गावर पुढे जात आहे का याची खात्री करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षक, कर्णधार, निवडकर्ता आणि एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सहसचिव दीपक पाटील यांच्यासोबत ४६ आढावा बैठका घेतल्या. एका बैठकीत, काही खेळाडूंना वैयक्तिकरित्या सांगितले गेले की ते इन्स्टाग्रामवर चार तास घालवत आहेत आणि त्यांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे.

“प्रत्येक खेळाडूला बोलावले जायचे आणि त्यांची कुठे चूक झाली आणि ते कसे सुधारू शकतात यावर आम्ही चर्चा करायचो. संघात सुधारणा व्हावी याकरता या गोष्टींकडे गंभीरपणे लक्ष देण्यासाठी अशी बैठक बोलावण्यात येत असे. या बैठकीमागची संकल्पना एकच होती की पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा संघात व्हावी.” असे एमसीएचे सचिव नाईक यांनी सांगितले.

अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी मुंबईने शेवटचा एक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला या मोसमातील स्वतचा प्रवास कसा होता, याबद्दल सांगायचे होते. साळवी म्हणतात, हिंदी चित्रपटांतील प्रशिक्षकांप्रमाणे ‘भाषण’ देण्याऐवजी त्यांनी खेळाडूंना फ्लॅशबॅक जाण्यास सांगितले. एक छोटासा व्हिडीओही बनवला होता.

“तो एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखा होता. जेव्हा आपण बॅकफूटवर जात असतो आणि तेव्हाच कोणीतरी मागून येऊन सामन्याचा हिरो ठरतो. आमच्याकडे प्रत्येक सामन्यात मॅच विनर्स होते. आम्ही या मोहिमेतील प्रवासाचा व्हिडिओ पाहिला. नंतर, प्रत्येक खेळाडूला रणजी ट्रॉफी जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे का आहे यावर बोलण्यास सांगितले गेले,” साळवींनी सामन्यानंतर सांगितले.

मुंबईच्या संघाने एका गाण्यासह या मोहिमेची सांगता केली. तामिळनाडूविरूध्द सेमीफायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या शार्दुल ठाकूरने हे गाणे गायले होते. आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील हे गाणं होतं. “Everywhere we go, everywhere we go, we are the Mumbai boys making all the noise, everywhere we go,” शार्दुलने या गाण्यात सीएसकेच्या जागी मुंबई हा शब्द वापरला. चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये इंग्लंडचे खेळाडूसुध्दा हे गाणं गात असतात, असे ठाकूरने या गाण्याबद्दल सांगताना सांगितले.